शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वंचितचे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर?; ताकद दाखवली, पण जागा मिळाल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:28 IST

वंचितला ‘बी टीम’ म्हणणाºया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचितचे उमेदवार दुसºया आणि तिसºया क्रमांकावर राहिले आहेत

धनाजी कांबळेपुणे : वंचित बहुजन आघाडीला लोकसभेला मिळालेली ४१ लाख मते अनेकांची डोकेदुखी ठरली होती. तीच स्थिती विधानसभेला देखील दिसून आली. विशेषत: वंचितने सर्वहारा, शोषित घटकांना सोबत घेऊन केलेले सोशल इंजिनिअरिंग यशस्वी होत असल्याचे दिसत असले तरी हे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर पडले, याचे चिंतन आता ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांच्या जय-पराजयामध्ये वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ५० ते ६० मतदारसंघांत मोठी लढत दिली असून, यापैकी २० ते २५ मतदारसंघांत वंचितच्या उमेदवारांची मते अनेकांच्या गडांना हादरे देणारी ठरली आहेत. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील मतदारसंघांमध्ये ४० ते ५० हजारांहून मते घेऊन वंचितने ताकद दाखवून दिली आहे.

वंचितमध्ये सहभागी असलेल्या दलित, ओबीसी, धनगर, अल्पसंख्याक, गरीब मराठा, लिंगायत अशा सर्व समूहांना एकत्र घेऊन एकजातीय ते सर्वसमावेशक अशी पक्षबांधणी केली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत लोकप्रिय, धनदांडग्या उमेदवारांना प्राधान्य न देता सर्वसामान्य माणसाला सत्तेत घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली. मात्र, त्याचा प्रत्यक्ष जागा मिळण्यात काही परिणाम दिसून आलेला नाही.

वंचितला ‘बी टीम’ म्हणणाºया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचितचे उमेदवार दुसºया आणि तिसºया क्रमांकावर राहिले आहेत. मात्र, साधारण दहा ते बारा मतदारसंघांत वंचितचे उमेदवार पंधराव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. १७ जागांवर काँग्रेस, ७ जागांवर भाजप, १४ जागांवर शिवसेना, ११ ठिकाणी राष्ट्रवादी, १० जागांवर अपक्ष, १ जागेवर एमआयएम आणि एका शेकापच्या जागेवर वंचितने उपद्रवमूल्य दाखवून मतांमध्ये आघाडी घेतलेली दिसते. मतांची प्रातिनिधिक आकडेवारी पाहता वंचितला कमी कालावधीत जनतेने दिलेला पाठिंबा म्हणजे आंबेडकरांनी केलेले सोशल इंजिनिअरिंग वंचित, शोषित घटकांना सत्तेत घेऊन जाऊ शकते, असा विवास देणारे आहे. स्वखर्चाने भाजी-भाकरी बांधून सभेला जमलेल्या मतदारांना सत्तेत जाण्याचे स्वप्न पाहण्याची दिशा देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.पक्षबांधणीवर लक्ष देणे गरजेचेदलित-बहुजन राजकारणाची घडी विस्कटलेली असताना आंबेडकरांसोबत असलेली जनता मोठ्या प्रमाणात आहे. त्याला स्वाभिमानी नेता, बाबासाहेबांचे नातू, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, वैचारिक धारिष्ट्य या जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत. सत्तेच्या लढाईत तडजोड महत्त्वाची मानली जाते. आंबेडकरांनी समविचारी पक्ष, संघटनांसोबत आघाडी केल्यास वंचितचे प्राबल्य वाढू शकते. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी हा भक्कम पर्याय अधिक व्यापक करण्याची संधी त्यांच्यासमोर आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर