शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाणाचा फैसला निवडणूक आयोगाच्या ‘काेर्टा’त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 05:48 IST

तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

नवी दिल्ली : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणत्या गटाला मिळणार व खरी शिवसेना कुणाची? यावर निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर असलेली स्थगिती मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने उठविली. यामुळे खरी शिवसेना व निवडणूक चिन्हाबाबत आता निवडणूक आयोगामध्ये कार्यवाहीला सुरुवात होईल, हे स्पष्ट झाले आहे. 

तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. उद्धव ठाकरे गटाने पहिल्यांदा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकालात काढा, नंतर निवडणूक चिन्हाचा निर्णय होऊ शकतो हा युक्तिवाद घटनापीठाने मान्य केला नाही. न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. आयोगासमोरील कार्यवाहीला यापुढे कोणतीही स्थगिती नसल्याचे न्या. धनंजय चंद्रचूड यांनी घोषित केले.

ठाकरे गटाचा युक्तिवाद शिंदे शिवसेनेचे सदस्य नाहीत युक्तिवादाची सुरुवात ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केली. शिंदे गटाने पक्षादेश धुडकावला, यामुळे त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत कार्यवाही केली आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी स्वत:हून पक्षाचे सदस्यत्व सोडल्यामुळे त्यांना शिवसेनेचा सदस्य असल्याचा दावा करता येत नाही. गेल्या ३० जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटाने १९ जुलैला निवडणूक आयोगाकडे आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेचे  सदस्य नाहीत. त्या सदस्याला मीच शिवसेनेचा खरा नेता आहे, हे म्हणण्याचा नैतिक व संवैधानिक अधिकार नसल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. 

घटनेच्या १० व्या अनुसूचीचे उल्लंघन  अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीचे उल्लंघन करून निवडणूक चिन्ह व खरी शिवसेना कुणाची यावर निर्णय होऊ शकणार नाही. पक्षातील दोन तृतीयांश सदस्य फुटून गेले तरी मूळ पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येत नाही. फुटून गेलेल्यांना दोनच पर्याय उरतात. एकतर दुसऱ्या पक्षात विलीन झाले पाहिजे किंवा दुसरा नवा पक्ष स्थापन केला पाहिजे. यापैकी एकही बाब शिंदे गटाने केलेली नाही. या स्थितीमध्ये निवडणूक आयोग शिंदे गटाच्या मागणीवर कसा काय विचार करू शकतो. 

शिंदे गटाचा युक्तिवाद उपाध्यक्षांच्या नोटिशीला अर्थ नाही शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी बाजू मांडली. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी २० जूनला बहुमत गमावले होते. मुख्यमंत्र्यांनी जसे बहुमत गमावले होते, तसेच विधानसभेच्या उपाध्यक्षांनीही विश्वास गमावला होता. त्यामुळे त्यांच्या नोटीसचा वैधानिकदृष्ट्या काहीही अर्थ उरत नाही.

प्रतोद बदलणे चुकीचे नाही बहुमताचे सरकार आल्यानंतर सभागृहाच्या नेत्याने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी प्रतोद बदलला, यात चूक काय आहे? असा सवाल करून ते म्हणाले, निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था आहे. या संस्थेच्या कामकाजावर कोणत्याही प्रकारे निर्बंध घालणे योग्य नाही. निवडणूक चिन्ह व खरी शिवसेना कुणाची हे ठरविण्यासाठी निवडणूक आयोगाला पुढे कार्यवाही करण्याची मुभा द्यावी. 

उपाध्यक्षांनी केलेली कृती चुकीची शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंग यानी उपाध्यक्षांची नोटीस योग्य नसल्याचे म्हटले. उपाध्यक्षांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना केवळ दोन दिवस उत्तर देण्याची मुदत दिली. नियमामध्ये सात दिवसांच्या मुदतीत उत्तर देण्याची तरतूद आहे. राजकीय पक्षाच्या संदर्भात निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हे निवडणूक आयोगाला असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

विधानसभा व लोकसभेत आमच्याकडे बहुमत आहे. विरोधी पक्षाला हवी असलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

 निवडणूक आयोग आपला निर्णय देऊ शकतो, असे कोर्टाने म्हटले आहे. यात धक्का बसण्याचा प्रश्न नाही. तसेच अपात्रतेबाबत न्यायालयात खटला सुरू राहील. अरविंद सावंत, खासदार, शिवेसना

निवडणूक आयोग या प्रकरणात बहुमताच्या नियमाची पारदर्शक प्रक्रिया लागू करील. ही एक ठराविक कार्यपद्धती आहे. आम्ही बहुमताचा नियम ठरवून आणि लागू करून अतिशय पारदर्शकपणे ही प्रक्रिया पूर्ण करू. सुप्रीम कोर्टाचा नेमका निर्णय वाचल्यानंतर कार्यवाही करू.राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय