कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? संजय राऊतांचा मोठा दावा! जोडलं महाराष्ट्र कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:10 IST2025-03-31T14:09:35+5:302025-03-31T14:10:32+5:30

Who Will be PM Modi's Successor: शिवसेना (उद्धव बाळासाहब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मोठा दावा केला आहे.

Who will be the successor of Prime Minister Modi? Sanjay Raut's big claim! Connection with Maharashtra | कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? संजय राऊतांचा मोठा दावा! जोडलं महाराष्ट्र कनेक्शन

कोण असणार पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी? संजय राऊतांचा मोठा दावा! जोडलं महाराष्ट्र कनेक्शन

PM Modi's Successor: पंतप्रधाननरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक असलेल्या वर्षप्रतिपदा (गुढी पाडवा) उत्सवानिमित्त रविवारी नागपुरातील संघ कार्यालयात पोहोचले होते. येथे त्यांनी संघाचे संस्थापक तथा पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली अर्पण केली. यानंतर ते संघाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले. दरम्यान, त्यांच्या या नागपूर दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आता शिवसेना (उद्धव बाळासाहब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मोठा दावा केला आहे. त्यांचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल, असे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र यासंदर्भात, भाजप अथवा संघाने अधिकृतपणे कसलेही भाष्य केलेले नाही. राऊत प्रत्रकारांसोबत बोलत होते.

काय म्हणाले राऊत? -
यावेळी, मोदींचे वारसदार कोण असतील? असा प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले, "यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्णय घेईल, असे दिसते. यावर, मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच बघायला मिळेल? असा प्रश्न केला असता राऊत म्हणाले, यामुळेच मोदींना काल बोलाऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तसेच, संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात, ते स्पष्ट आहेत. पुढचा नेता संघ ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल." 

पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, " जी माहिती बाहेर येत आहे, ती स्पष्ट आहे की, सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी जे धोरण जाहीर केले आहे की, 75 वर्षं झालेल्या व्यक्तीने सत्तेच्या कोणत्याही पदावर राहू नये. यामुळे सरसंघचालकांनी त्यांना या त्यांच्या भूमिकेची अथवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा केली. की आता आपली वेळ आली आहे. सप्टेंबर महिना येतो आहे. तेव्हा देशाचे नेतृत्व बदलावे लागेल. 

याशिवाय, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भातही संघाची एक भूमिका असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी, ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दसते. ज्या अर्थी पंतप्रधान मोदींना 10-11 वर्षांनंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावे लागले, ही काही साधी गोष्ट नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Web Title: Who will be the successor of Prime Minister Modi? Sanjay Raut's big claim! Connection with Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.