शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

...अन् शिवसेनेबद्दलचे शरद पवारांचे 'ते' शब्द पाच वर्षांनी खरे ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 07:54 IST

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणण्यात पवारांना यश

मुंबई: महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षानंतर राज्यात सरकार स्थापन झालं. दोन दिवसांपूर्वी शपथविधी झाल्यानंतर काल महाराष्ट्र विकास आघाडीनं विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपा-शिवसेनेत वाढलेला दुरावा, शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय, राष्ट्रपती राजवट, शिवसेनेचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी झालेला घरोबा, त्यानंतर तीन पक्षांनी केलेली सत्तास्थापना अशा अनेक अभूतपूर्व घडामोडी विधानसभा निवडणुकीत घडल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीनं काल विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. नव्या सरकारच्या स्थापनेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी काढलेले उद्गार खरे ठरले.ऑक्टोबर २०१४ मध्ये पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना, भाजपाची युती तुटली होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादीनंदेखील स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याबद्दल शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले राजकारणापलिकडील संबंध होते. बाळासाहेब असते, तर शिवसेना सध्यासारखी एकाकी पडली असती का?', असा प्रश्न विचारताच 'कोण म्हणत सेना एकाकी आहे?,' असा प्रतिप्रश्न पवारांनी केला. पवारांच्या या प्रतिप्रश्नानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.पत्रकारांच्या प्रश्नाला पवारांनी क्षणार्धात उत्तर दिलं. पवारांच्या एका विधानाचे अनेक अर्थ निघतात. त्याची जाणीव खुद्द पवारांनाही असल्यानं दुसऱ्याच क्षणी त्यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. ‘शिवसेना एकटी लढते आहे, तशीच राष्ट्रवादीसुद्धा एकटीच लढते आहे. तुम्ही आम्हाला एकाकी म्हणत नाही,’ असं पवार म्हणाले. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावेळी त्यांनी सध्याच्या नेतृत्त्वांशी माझं काही जुळत नाही. जनरेशन गॅप असावी बहुधा, असा टोला लगावला होता. कोण म्हणत शिवसेना एकाकी, हे शरद पवारांचे ऑक्टोबर २०१४ मधले उद्गार यंदाच्या नोव्हेंबरमध्ये खरे ठरले. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन भाजपापासून दूर गेल्यानंतर 'आम्ही विरोधी बाकांवर बसू' ही भूमिका राष्ट्रवादीनं सोडली. त्यानंतर पवार सतत शिवसेनेच्या संपर्कात होते. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास सुरुवातीला काँग्रेस फारशी उत्सुक नव्हती. मात्र काँग्रेस नेतृत्त्वाचं मन वळवण्यातही पवारांनी मोठी भूमिका बजावली. त्यानंतर झालेलं अजित पवारांचं बंडदेखील पवारांनी अतिशय चतुराईनं हाताळलं. काँग्रेस आणि शिवसेनेमधला दुवा होत त्यांनी राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आणलं. त्यामुळे ५ वर्षांपूर्वीचे त्यांचे उद्गार खरे ठरले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार