"अजित पवारांना अटक करण्यापासून कुणी रोखले ?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 21:56 IST2018-11-11T21:56:12+5:302018-11-11T21:56:21+5:30

राज्यात सत्तेत असून आम्ही नसल्यासारखे आहोत. विरोधकांची भूमिकाही शिवसेनाच करीत आहे.

"Who prevented Ajit Pawar from arresting?" | "अजित पवारांना अटक करण्यापासून कुणी रोखले ?"

"अजित पवारांना अटक करण्यापासून कुणी रोखले ?"

जळगाव : राज्यात सत्तेत असून आम्ही नसल्यासारखे आहोत. विरोधकांची भूमिकाही शिवसेनाच करीत आहे. अजित पवार बोलायला लागले की आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू, असे सुनावले जाते. मात्र चार वर्षांत भाजपाने अजित पवारांना 71 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असतानाही अद्याप जेलमध्ये का टाकले नाही? त्यांना अटक करण्यासाठी शिवसेनेने अडवले होते काय? असा सवाल करीत राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारला घरचा अहेर दिला.

चोपडा येथे रविवारी आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे होते. राज्यमंत्री पाटील पुढे म्हणाले की,  पुतण्याला वाचवण्यासाठी शरद पवार यांनी राज्य सरकार स्थापन करताना आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, असे सांगून भाजपाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच अजित पवार यांच्यावर कारवाई होत नसल्याचेही ते म्हणाले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही राज्यमंत्र्यांनी टीका केली.  ते म्हणाले की, महाजन हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उजव्या बाजूला बसतात.  मात्र त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही एवढेच नाही, तर यांनी निम्न तापी प्रकल्पाचे कामही केले असते तर लोकांनी गावागावात महाजन यांचे फोटो लावले असते.

Web Title: "Who prevented Ajit Pawar from arresting?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.