शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 19:26 IST

एल्गार परिषद आणि काेरेगाव भीमा येथील दंगल या दाेन वेगवेगळ्या केसेस असून यातील काेरेगाव भीमा येथील दंगलीबाबतच्या केसकडे दुर्लक्ष झाले आहे.

पुणे : पेरणेफाटा येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात़ या घटनेला २०० वर्षे झाल्यानिमित्ताने अभिवादन कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले़ त्यातून कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी मोठी दंगल झाली़ त्याच्या आदल्या दिवशी पुण्यात शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषद झाली होती़ या एल्गार परिषदेवरुन आता राजकारण खुप तापले आहे. मात्र, त्यामुळे कोरेगाव भीमा येथील दंगल नेमकी कोणी घडविली की घडवून आणली, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या दंगलीमागे नेमका कोणाचा हात होता, याचा छडा लावण्याचे सर्वात मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांवर पर्यायाने राज्य शासनावर आहे. मात्र, राजकारणात नेमके त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली संदर्भात शिक्रापूर पोलिसांकडे एकूण २२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आतापर्यंत ११४ जण निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली होती. ते सर्व जण आता जामीनावर सुटले आहेत. या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात याबाबत एक स्वतंत्र सेल तयार करण्यात आला होता. या सेलमध्ये असलेल्या दोन्ही पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. त्यामुळे सध्या या सेलचे काम जवळपास ठप्प झाले आहे. या दंगलीत राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यु झाला होता. त्यातील आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. तो गुन्हा सध्या तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषणकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या आठवड्यात पुण्यात आले होते. सहाजिकच एल्गार परिषदेवरुन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या तपासातील मतभिन्नतेवरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आले. गेले काही दिवस हा प्रश्न सातत्याने चर्चेला जात असताना गृहमंत्री म्हणून याबाबत अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली असताना तसेच एनआयएकडे एल्गारचा तपास देऊ नये, असा प्रस्ताव तयार करुन तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला होता. असे असताना त्यांना एल्गार आणि कोरेगाव भीमा हे दोन्ही वेगवेगळे गुन्हे आहेत, याची पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले होते. कोरेगाव भीमाची दंगली ही घडविण्यात आल्याचा आरोप डाव्या पक्षांकडून सातत्याने केला गेला आहे. त्यातूनच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा दंगलीच्या गुन्ह्या मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती.ही दंगल घडविल्याचा आरोप करताना त्यातील अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे सांगितले जाते. १ जानेवारी पूर्वी गावातील घरांच्यावर, कमानीवर दगड आणून रचून ठेवले होते. तसेच १ जानेवारीला गावात बंद पाळण्याचे आवाहन करुन संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते, असे आरोप केले जात आहेत. त्यामागे नेमके कोण आहे, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही. 

एल्गार परिषदेत जाणिवपूर्वक तपास वेगळ्या दिशेने व काही जणांना त्रास देण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याचवेळी दोन वर्षे होऊनही कोरेगाव भीमा दंगलीचा तपास पूर्ण झाला नाही. पोलिसांनी जे आरोपी पकडले, ते सीसीटीव्हीत निष्पन्न झाले होते, त्यांच्यावर कारवाई झाली आहे.मात्र, त्यांना दंगली घडविण्यासाठी कोणी प्रोत्साहित केले, ते तेथे खरंचे आले होते की त्यांना आणले गेले होते, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही. यातील २२ गुन्ह्यांपैकी एकाचाही खटला अद्याप सुरु झालेला नाही़ एल्गारमध्ये ज्याप्रमाणे काही लोकांना जाणीवपूर्वक डांबले गेले असले म्हटले जाते. कोरेगाव भीमाची दंगल ही उजव्या विचाराच्या लोकांनी घडविल्याचा आरोपही केला गेला आहे. त्यामुळेच यातील सत्य पुढे येऊ नये, यासाठी हा तपास रेंगाळला गेला आहे का?  ही दंगल खरंच घडविली गेली असेल तर त्यामागील नेमके कोणाचे हात होते, हे सत्य बाहेर आणण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांबरोबरच राज्य शासनावर आहे. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस