शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
2
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
3
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
4
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
5
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
6
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
7
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
8
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
9
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
10
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
11
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
12
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
13
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
14
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
15
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
16
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
17
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
18
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
19
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
20
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
Daily Top 2Weekly Top 5

समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:10 IST

गुन्हेगारी विश्वास पोलिसांवर दबाव टाकून गुन्हेगारांना कशी मदत करता येईल हे काम समीर पाटील करतो असा आरोप त्यांनी केला. 

पुणे - शहरातील गुन्हेगारी विश्वास कुप्रसिद्ध असलेला गुंड निलेश घायवाळ याला पासपोर्ट मिळाल्याने तो देश सोडून पळून गेला. या मुद्द्यावरून शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील  यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात येत आहेत. समीर पाटील उर्फ मिनी चंद्रकांतदादा म्हणत धंगेकरांनी एक फोटो ट्विट केला आहे. गुन्हेगारी, दहशत, कोयता गँग, अवैध धंदे, बिझनेस डिल्स आणि समीर पाटील आणि आदरणीय चंद्रकांतदादा हे सगळं एकत्र समीकरण आहे असा आरोप धंगेकर यांनी केला आहे. 

शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर म्हणाले की, निलेश घायवाळ पासपोर्ट मिळाल्यानंतर देश सोडून पळाला ही प्रचंड गंभीर बाब आहे. हा पासपोर्ट कुणी दिला त्या अधिकाऱ्यावर चौकशी झाली पाहिजे. त्या अधिकाऱ्याला कुणी फोन केला, पाठिंबा दिला हेदेखील शोधले पाहिजे. कोथरूडमध्ये निलेश घायवाळची दादागिरी कित्येक वर्ष सुरू आहे. गुन्हेगाराला जातपात, पक्ष नसतो. सत्ता असेल तो पक्ष..चंद्रकांत पाटील हे सत्तेत असताना कोथरूडमध्ये गुन्हेगारी फोफावते कशी हा सोपा प्रश्न आहे. चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधील समीर पाटील ही सगळी कामे करतो. गुन्हेगारी विश्वास पोलिसांवर दबाव टाकून गुन्हेगारांना कशी मदत करता येईल हे काम समीर पाटील करतो असा आरोप त्यांनी केला. 

तसेच माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असं समीर पाटील म्हणाले, मी १०० कोटींचा मालक आहे असा दावा त्यांनी केला. त्यानंतर समीर पाटील कोण हे तपासले असता. समीर पाटील चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला असणारे फोटो दिसले. १०० कोटींचा मालक असेल आणि राजकारणाचा काही संबंध नसेल तर हा तिथे काय करतो? मी समीर पाटीलचे फोटो ट्विट केलेत. समीर पाटीलला पहिला मोक्का लागला होता. २० वर्षापूर्वी पुण्यात आलेला समीर पाटील १०० कोटींचा मालक कसा झाला? चंद्रकांत पाटील कदाचित आत्मचिंतन करत असतील त्यामुळे या प्रकरणावर बोलत नसतील. संशयाची सुई त्यांच्यावर आहे त्यांनी बोललं पाहिजे अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. 

दरम्यान, १०० कोटी कसे कमावले, चंद्रकांत पाटील यांच्याकडे बेरोजगार युवकांना पाठवले पाहिजे. १०० कोटी कसे कमवायचे हे कळेल. चंद्रकांत पाटलांचा मानस पुत्र असल्यासारखे फोटो समीर पाटील लावतो. समीर पाटलांनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे म्हणजे मला अजून माहिती मिळेल. घायवाळ टोळी संपवली पाहिजे. पोलिसांनी फडकं टाकून गोळ्या पुसल्या पाहिजेत. समीर पाटील आणि निलेश घायवाळचे अनेक फोटो आहे. लोकशाहीत तुम्ही केलेले पाप कधीतरी उघड होते. जे राजकारण सुरू आहे ते थांबवले पाहिजे. समीर पाटील यांच्या व्यवहाराची चौकशी केली सर्व धागेदोरे उघड होतील असं धंगेकर यांनी म्हटलं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrakant Patil Accused: Who is Sameer Patil? Source of wealth?

Web Summary : Shinde Sena's Dhangare accuses BJP's Chandrakant Patil of aiding criminal Nilesh Ghaywal through Sameer Patil. Questions raised on Sameer's wealth source.
टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलravindra dhangekarरविंद्र धंगेकरBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी