कोण नवनीत राणा?, ती तर....; विद्या चव्हाण यांची बोचरी टिपण्णी, रवी राणांचीही खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 10:11 AM2022-05-14T10:11:58+5:302022-05-14T10:14:05+5:30

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज नवी दिल्लीतील एका प्राचीत हनुमान मंदिरात महाआरती करण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

Who is Navneet Rana nobody cares ncp leader Vidya Chavan criticism | कोण नवनीत राणा?, ती तर....; विद्या चव्हाण यांची बोचरी टिपण्णी, रवी राणांचीही खिल्ली

कोण नवनीत राणा?, ती तर....; विद्या चव्हाण यांची बोचरी टिपण्णी, रवी राणांचीही खिल्ली

Next

मुंबई-

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज नवी दिल्लीतील एका प्राचीत हनुमान मंदिरात महाआरती करण्यासाठी रवाना झाल्या आहेत. राणा दाम्पत्याच्या ठाकरे सरकारविरोधातील या आंदोलनावर टीका करताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. कोण नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांना का एवढं महत्व द्यायचं?, असं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत. 

"कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीचा अपमान करतो हे कितपत योग्य आहे? आणि कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून द्या खोट्या खासदार झाल्या आहेत. त्यांना एवढं महत्व द्यायची काहीच गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे दाम्पत्य असा प्रकार करत असतं", असं विद्या चव्हाण म्हणाल्या. 

रवी राणांनी झाकण नसलेले कुकर वाटले
विद्या चव्हाण यांनी यावेळी रवी राणा यांच्यावरही खरमरीत शब्दात टीका केली. "राणा दाम्पत्य अमरावतीत काय करतं हे सर्वांना माहित आहे. रवी राणा यांनी निवडणुकीवेळी सर्व महिलांना प्रेशर कुकर वाटले होते. त्यांना झाकणच नव्हतं म्हणून सगळ्या महिला त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावर रवी राणांनी तुम्ही मला मतदान करा मग झाकण देतो असं म्हटलं होतं. यावरुन यांची कुवत लक्षात येते", असं विद्या चव्हाण म्हणाल्या. 

राणा दाम्पत्याकून नवी दिल्लीत महाआरती
इथं महाराष्ट्रात आज बीकेसी मैदानात शिवसेनेची जाहीर सभा होत असताना त्याच दिवशी आज दिल्लीत राणा दाम्पत्याकडून हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. राणा दाम्पत्य हनुमान मंदिरात पोहोचलं असून थोड्याच वेळात महाआरती केली जाणार आहे. यासाठी मोठी गर्दी देखील जमा झाली आहे. ठाकरे सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी हनुमंताकडे प्रार्थना करत असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Who is Navneet Rana nobody cares ncp leader Vidya Chavan criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app