आज विजयादशमीनिमित्त राज्यभरात विविध पक्ष, संघटना आणि नेत्यांचे दसरा मेळावे सुरू आहेत. त्यात बीड जिल्ह्यात झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र या मेळाव्यात भाषण सुरू असताना अचाकन पंकजा मुंडे ह्या समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांवर चांगल्याच संतापल्या. तसेच हा प्रसंग आता चर्चेचा विषय ठरला आहे.
त्याचं झालं असं की, पंजका मुंडे ह्या उपस्थित समर्थकांना संबोधित करत असतानाच एका कोपऱ्यातून काही तरी घोषणाबाजी सुरू झाली. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण मध्ये थांबवून ही घोषणाबाजी करणाऱ्यांना सुनावले. त्या म्हणाल्या की, पोरांनो तुम्ही वाटोळं केलं. तुम्ही कोणाची सुपारी घेऊन आला आहात हे मला माहिती नाही. तुम्हाला शरम नाही. जी शरम गोपिनाथ मुंडेंच्या नजरेत होती, जी शरम माझ्या नरजेत होती, ती तुमच्यात दिसत नाही. माझ्या नावाच्या घोषणा दिल्याने तुम्ही पवित्र होणार नाही. तुम्ही कशासाठी आला आहात हे मला समजलं आहे. जो माझा भगवानगडावरील दसरा होता तो माझ्याकडून हिरावून घेतला गेला. आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आला आहात का? असं मला वाटायला लागलं आहे. इतकी वर्षं मी भाषण केलं, पण अशा बेशिस्तपणे कुणी वागलेलं मी पाहिलं नाही. तुम्ही तुमच्या शुद्धीत नाही आहात. अशी बेशिस्त माणसं मी सांभाळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी त्यांच्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, दसरा मेळाव्यात संबोधित करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, चांगल्या माणसाचे चांगलेच होते, भगवान बाबांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतात. मला तुमचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. मी तुमच्यासमोर नतमस्तक झाले त्याचा अभिमान आहे. दरवर्षी राज्यातून मोठ्या संख्येने लोक मेळाव्याला येतात. आपला दसरा फक्त मेळावा नाही. अत्यंत संघर्षाने उभ्या राहिलेल्या साध्या भोळ्या फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे. नदीला पूर आला असताना, गावागावात पाणी शिरले असताना लोकांची घरे, संसार वाहून गेले असताना तुम्ही इतक्या उन्हात इथं आला. सोन्यासारखी माणसं इथं सोनं लुटण्यासाठी आलेत. एक एक माणूस सोन्याचं खणखणणारं नाणे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Web Summary : Pankaja Munde rebuked slogan-shouting supporters at a Dasara rally, questioning their motives and discipline. She expressed disappointment, contrasting their behavior with Gopinath Munde's values, and emphasized the event's significance for ordinary people amidst recent floods.
Web Summary : पंकजा मुंडे ने दशहरा रैली में नारे लगाने वाले समर्थकों को फटकार लगाई, उनकी मंशा और अनुशासन पर सवाल उठाया। उन्होंने निराशा व्यक्त की, उनके व्यवहार की तुलना गोपीनाथ मुंडे के मूल्यों से की, और हाल की बाढ़ के बीच आम लोगों के लिए कार्यक्रम के महत्व पर जोर दिया।