शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आणीबाणीत तुम्ही कुठे होतात, सांगू का...?; माजी विधानसभा अध्यक्षांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 1:17 PM

भाजपा नेते हरिभाऊ बागडे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

मुंबई: मला माझ्या व्यंगाचं दु:ख वाटत नाही. तर अभिमानच वाटतो, अशा शब्दांत विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी आणीबाणीचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. आणीबाणीला आम्ही कडाडून विरोध केला होता. त्यावेळी मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. मात्र त्याची मी तक्रार करत नाही. उलट त्यावेळी झालेल्या त्रासामुळे आलेल्या शारीरिक व्यंगाचा मला सार्थ अभिमान वाटतो, असं बागडे म्हणाले. यावेळी त्यांनी तुम्ही आणीबाणीवेळी नेमके कुठे होतात, असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते हरिभाऊ बागडेंनी विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नाना पटोलेंचं अभिनंदन केलं. त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांनी आपली बाजू जास्त ऐकून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर भाष्य करताना बागडेंनी आणीबाणीचा संदर्भ दिला. मला ऐकण्यात अडचणी येतात. मात्र आणीबाणीचा सामना करताना मला हे व्यंग आलं. त्यामुळे त्याचं दु:ख वाटण्याऐवजी अभिमानच वाटतो, अशा भावना व्यक्त करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. 'सभागृहातील काहींनी तुम्हाला डावीकडून ऐकायचं, उजवीकडून ऐकायचं, डावीकडे पाहायचं, उजवीकडे पाहायचं असं सांगितलं. मात्र माझ्या ऐकण्याची अडचण आजची नाही. ते व्यंग आणीबाणीतलं आहे आणि त्याचा मला रास्त अभिमान आहे. त्यावेळी माझ्याकडे सत्याग्रह करण्याचं काम होतं. त्यामुळे मी दिवस-रात्र हिंडायचो. प्रचंड थंडीतून प्रवास करायचो. त्या थंडीत हातपाय बधीर व्हायचे. त्याचा परिणाम शरीरावर झाला. मी बेशुद्ध पडलो. पण २-३ दिवस डॉक्टरकडे गेलो नाही. तेव्हा मला ऐकू यायचं नाही. या घटनेला आता ४५ वर्ष झाली. काहींना हे माहीत नसेल, म्हणून आज मी हे सांगतो आहे. तुम्ही त्यावेळी कुठे होतात सांगू का? पण ते आज मी सांगणार नाही. कारण मी विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करायला उभा आहे', असं बागडे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेBJPभाजपा