शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

विठुरायाच्या ५०० हेक्टर जमिनी गेल्या कुठे?

By admin | Updated: July 29, 2014 02:42 IST

गेल्या काहीशे वर्षांत दानशूर भक्तांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास दान केलेल्या सुमारे ५०० हेक्टर जमिनींची कोणतीही नोंद मंदिर समितीकडे नसून

मुंबई : गेल्या काहीशे वर्षांत दानशूर भक्तांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास दान केलेल्या सुमारे ५०० हेक्टर जमिनींची कोणतीही नोंद मंदिर समितीकडे नसून या जमिनी खासगी व्यक्तींच्या ताब्यात आहेत, अशी धक्कादायक बाब एका जनहित याचिकेच्या निमित्ताने समोर आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या जमिनींचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरिय समिती नेमण्याची सूचना सोमवारी केली.हिंदू जनजागृती समितीने ही जनहित याचिका केली असून महाराष्ट्र व कर्नाटकमधील अनेक गावांमधील सुमारे ५०० हेक्टर जमिनी दानशूर भक्तांनी वेळोवेळी पंढरपूर मंदिरासाठी दान केल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. खासगी व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या या सर्व जमिनी मंदिर समितीने ताब्यात घेऊन त्यांचा विकास करावा आणि त्या पैशातून पंढरपूरला येणाऱ्या यात्रेकरूंना सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. न्या. अभय ओक न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठापुढे सोमवारी ही याचिका सुनावणीस आली तेव्हा हे प्रकरण गंभीर असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले व या जमिनींचा शोध घेणे आवश्यक याहे, यावर भर दिला. या जमिनी नेमक्या कुठे आहेत, त्या सध्या कोणाच्या ताब्यात आहेत व त्यांचा काय वापर करण्यात येत आहे इत्यादी बाबींचा शोध घेण्यासाठी एक उच्चस्तरिय समिती नेमण्याची आवश्यकताही न्यायमूर्तींनी बोलून दाखविली. अशी समिती स्थापन करणार की नाही याचे उत्तर देण्यासाठी राज्य सरकार आणि मंदिर समितीस चार आठवड्यांचा वेळ देऊन सुनावणी तहकूब करण्यात आली. (प्रतिनिधी)