शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

'ती' परत आलीये, चौकशीसाठी कधी बोलवणार?; सचिन सावंत यांचा एनसीबीला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 1:05 PM

Kangana Ranaut : कंगनाची पाठराखण करणारेही आता गप्प असल्याचा सावंत यांचा आरोप

ठळक मुद्देकंगनाची पाठराखण करणारे गप्प असल्याचा सचिन सावंत यांचा आरोपभाजपानं जनतेची माफी मागण्याचीही केली मागणी

 "बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यात कलाकार व त्यांच्या संबंधित अनेकांची चौकशी केली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडीओवरून एनसीबीची चौकशी सुरू आहे. हा व्हिडीओ दोन वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी राज्यात फडणवीस सरकार होते. त्यावेळी याची चौकशी केली नाही. बॉलिवूडला जाणीवपूर्वक दहशतीखाली ठेवण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे. तर स्वतः ड्रगचे सेवन करणारी व दुसऱ्यांना जबरदस्तीने ड्रग घेण्यास भाग पाडणाऱ्या कंगना रणौतला मात्र आजपर्यंत एनसीबीने चौकशीला बोलावले नाही. आता ती पुन्हा मुंबईत आलेली आहे त्यामुळे कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार हे एनसीबीने सांगावे," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सांवत यांनी केली. "कंगणाने स्वतः ड्रग्ज घेत असल्याची कबुली देणारा एक व्हिडीओ अनेक महिन्यांपासून व्हायरल झाला आहे. तिचा एक मित्र अद्ययन सुमन यांनंही कंगना ड्रग घेण्यास भाग पाडत होती तोही व्हिडीओ जगजाहीर आहे. बॉलिवूडमधील ड्रग संदर्भात आपल्याकडे माहिती असून ती आपण देऊ असंही कंगनानं जाहीरपणे सांगितलं होतं. असं असताना एनसीबी त्याकडे गांभीर्यानं का पहात नाही आणि तिला चौकशीसाठी का बोलावत नाही. कंगनाला मोदी सरकारने पुरवलेली वाय दर्जाची सुरक्षा आजही तिला आहे. या सुरक्षेचा खर्च जनतेच्या पैशातून होतो, तो वाया जात आहे," असंही सचिन सावंत यावेळी म्हणाले. कंगनाची पाठराखण करणारेही गप्प

"कंगनाची पाठराखण करणारे भारतीय जनता पक्षाचे लोकही याविषयावर आता गप्प आहेत. राम कदम यांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीशी केली होती. ड्रग्ज संदर्भात कंगनाकडील माहिती बाहेर आल्यास अनेकांचे पितळ उघडं पडेल म्हणून महाविकास आघाडी सरकार ती माहिती उघड होऊ देत नाही असा आरोपही राम कदम यांनी केला होता. एवढी महत्वाची माहिती दडवणे हाही गुन्हाच आहे. त्यामुळे राम कदम यांनी कंगनाला तिच्याकडे असलेली माहिती एनसीबीला देण्यास सांगावं," असंही ते म्हणाले. "या संपूर्ण प्रकरणात भाजपाने कंगनाला साथ देत महाराष्ट्राची बदनामी केली. कंगनाचा बोलवता धनी भाजपा आहे हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजपण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपाने महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे," असंही सावंत म्हणाले. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतSachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई