शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

राज्यातील चित्रपटगृह, मंदिरे, हॉटेल्स कधी सुरु होणार ? सुप्रिया सुळेंनी दिले ' हे' उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 13:59 IST

येत्या आठ दहा दिवसांत राज्यातील कोरोनाचे चित्र आणखी सुधारण्याची शक्यता..

ठळक मुद्देखासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची घेतली भेट

पुणे : केंद्र सरकारने प्रवासासाठी लागणारा ई- पास रद्द करण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या असताना मग यावर राज्य सरकारची भूमिका अशी विरोधी का आहे. तसेच राज्यातील चित्रपटगृहे,मंदिरे,जिम तसेच हॉटेल्स कधी सुरु होणार आहे ? या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट प्रतिक्रिया देताना म्हटले की, पुण्यात कोविडबाबत स्थिरता असली तरी परिस्थिती धोक्याबाहेर आहे असे म्हणता येणार नाही. कोणीही धोका पत्करू नये. याबाबत तज्ज्ञांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. राज्यातील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. येत्या आठ दहा दिवसांत राज्यातील चित्र आणखी सुधारण्याची शक्यता आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री व पालकमंत्री ई- पास सह राज्यातील 'अनलॉक' च्या बाबतीत निर्णय घेण्याची शक्यता आहे.  

खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेत कोरोनाची शहरातील स्थिती आणि त्यांच्या मतदार संघातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुळे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या परिक्षांबाबत सुळे म्हणाल्या, जेईई-नीट वगैरे परिक्षांबाबत आता तारखा पुढे ढकलू नयेत अशी न्यायालयाला विनंती करते. देशभरातील राज्य सरकारांनी आपापली भूमिका न्यायालयात मांडली आहे. त्यामुळे आता वेळेत निर्णय व्हावा. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर फार बोलणे उचित होणार नसून महाराष्ट्र शासनाचे जे मत आहे तेच माझे मत असल्याचेही सुळे म्हणाल्या.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरावरून बारामतीमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी राजू शेट्टी यांना जोरदार टोला लगावताना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. आमचे सरकार दडपशाहीचे सरकार नाही.  कोणाला आंदोलनाची इच्छा झाली तर त्याचे स्वागत करायला हवे असे मत व्यक्त केले. . खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने मशिदी उघडू दिल्या नाहीत तर आम्ही स्वतः उघडू असा इशारा दिला आहे. त्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, सरकारला वेळ देणे आवश्यक असून मागण्या, सूचना यांचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो. लोकशाहीने जलील यांना आंदोलनाचा अधिकार दिला आहे. 

यावेळी परभणीच्या शिवसेना खासदारांचा राजीनामा आणि सुशांतसिंग रजपूत सीबीआय चौकशी प्रकरणावर बोलणे त्यांनी टाळले. विशेषतः सुशांतसिंग रजपूत प्रकरणावर बोलायला आवडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.------- 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSupriya Suleसुप्रिया सुळेState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे