काय ते मंत्री? काय ते मंत्रिमंडळ? काय ते हिंदुत्व? काही दिवस समधं ok; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 19:51 IST2022-08-09T19:48:46+5:302022-08-09T19:51:53+5:30
शिंदे सरकारच्या या मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यानी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

काय ते मंत्री? काय ते मंत्रिमंडळ? काय ते हिंदुत्व? काही दिवस समधं ok; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारवर निशाणा
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा गेल्या 38 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 9 आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 9, अशा एकूण 18 आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ दिली आहे. शपथ घेतलेल्या सर्वांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यानंतर आता, या मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यानी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या स्टाईलमध्ये शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. "काय ते मंत्री? काय ते मंत्रिमंडळ? काय ते हिंदुत्व? काही दिवस समधं okk," असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.
काय ते मंत्री? काय ते मंत्रिमंडळ ? काय ते हिंदुत्व काही दिवस समधं okk
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 9, 2022
याच बरोबर आणखी एक ट्विट करत, "अर्थ व गृह खात्यावर गेल्या अनेक दिवसांपासून द्वंद्व युद्ध सुरू असताना, शिंदे गटाच्या नाक्कावर टिच्चून दोन्हीं महत्वाची खाती स्वतःकडे ठेवून शिंदे गटावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन. आपल्या अधिपत्याखाली हे सरकार चालेल यात शिंदे गटाला अजिबात शंका नाही. @Dev_Fadnavis," असे मिटकरी यांनी म्हटले आहे. याट्विटसोबत मिटकरी यांनी एक इमेज पोस्ट करत भाजपवरही निशाणा साधला आहे. यावर "दूध सी सफेदी भाजपा से आऐ, कलंकीत नेता भी खिल खिल जाऐ. वॉशिंग पउडर भाजपा", असे लिहिले आहे.
अर्थ व गृह खात्यावर गेल्या अनेक दिवसांपासून द्वंद्व युद्ध सुरू असताना,शिंदे गटाच्या नाक्कावर टिच्चून दोन्हीं महत्वाची खाते स्वतःकडे ठेवून शिंदे गटावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन.आपल्या अधिपत्याखाली हे सरकार चालेल यात शिंदे गटाला अजिबात शंका नाही.@Dev_Fadnavispic.twitter.com/28HOgbG64l
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 9, 2022