DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:00 IST2025-09-06T14:59:24+5:302025-09-06T15:00:29+5:30
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांची शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्राची तपासणी करावी, अशी मागणी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली आहे.

DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
सोलापूर - सध्या सोशल मीडियात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून विरोधकांनी अजित पवारांवर निशाणा साधला. अवैध उत्खननाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले असा दावा करण्यात येत आहे. कारवाईस्थळी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढा तालुका युवकचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या हातात फोन दिला अन् संवाद सुरू होतो.
अजित पवार : सुनो, मैं डिप्टी चीफ मिनिस्टर अजित पवार आपके साथ बोल रहा हूं. मैं आपको आदेश देता हूं, की आप वो रुकवावो. आप जावो, तहसीलदार को बताओ, खुद अजित पवारजी का फोन आया था. डेप्युटी चीफ मिनिस्टरने कहा ये सब रुकवाने के लिये. क्यों की अभी बंबई का जरा माहोल एकदम खराब हुआ है. उसको अपने को प्राधान्य देना है, मेरा नाम बताओ उनको.
अंजना कृष्णा : सर, ओ मुझे, आप एक काम किजीये, मुझे अपने फोन मे मुझे डायरेक्ट कॉल किजीये ना..
अजित पवार : एक मिनिट, एक मिनिट...मै तेरे उपर अॅक्शन ले लुंगा. अभी खुद मै आपके साथ बोल रहा हूं. आप मुझे डायरेक्ट कॉल बताती है?
अंजना कृष्णा : सर, मुझे नही पता है, सर, मैं समझ रही हूं सर, जो बोल रहे समझ रही है. पर मुझे कैसे..?
अजित पवार : सुनो, सुनो, सुनो... मुझे देखना है ना, मेरा नंबर देता हूं, व्हॉट्सअॅप कॉल करो.
अंजना कृष्णा : ठीक है.
अजित पवार : मैं यहां से बोल लेता हूं.
अंजना कृष्णा : ठीक है.
अजित पवार : मेरा चेहरा तो आपको समझ मे आयेगा ना?
अंजना कृष्णा : ठीक है सर.
अजित पवार : इतना आपको डेअरिंग हुआ है क्या?
अंजना कृष्णा : सर मैनेतो कारवाई किया है, मुझे कैसे पता है सर, सर मुझे पता नही है ना सर.
अजित पवार : मैं डेप्युटी चीफ मिनिस्टर...
अंजना कृष्णा : सर, समझ रही है, वो आप बोल रहे है.
अजित पवार : आपका नंबर दे दो मुझे.
अंजना कृष्णा : ठीक है सर, नाईन डबल फोर...
अजित पवार : नंबर दे दो ना...
अंजना कृष्णा : नाईन डबल फोर (नंबर देतात), सर एक बार आप बता दिजीयेगा, हम करेंगे उसमे कोई दिक्कत नही. हम लोग रेकॉर्डिंग करेंगे.
अजित पवार : सुनो, सुनो, सुनो...
अंजना कृष्णा : येस सर, येस सर.
अजित पवार : ओके, थैंक यू..!
आणि इथं हा संवाद संपतो..
आमदार अमोल मिटकरींचं कृष्णा यांच्याविरोधात UPSC ला पत्र
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांची शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्राची तपासणी करावी, अशी मागणी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली आहे. अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून आयोगाच्या स्तरावर कागदपत्रांची सखोल तपासणी करून संबंधितांना अवगत करण्यात यावे, असे मिटकरी यांनी आयोगाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अंजना कृष्णा यांची चौकशी कशासाठी, तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून का, असा प्रश्न केला आहे.