शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

शुकदासांच्या आश्रमात सारस्वतांचा मांडव कशासाठी? ‘अंनिस’चा आक्षेप , साहित्य संमेलनाच्या स्थळावरून वाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:34 IST

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे घेण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिवरा आश्रम हा वादग्रस्त शुकदास महाराजांचा असल्याने, त्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी भूमिका अंनिसने घेतली आहे. तर साहित्य संमेलनाच्या आयोजनात नाक खाजवून अपशकून करू नका, सारस्वतांच्या सन्मानात तुम्हीही सहभागी व्हा, असे आवाहन आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी केले आहे.

नागपूर/पुणे/ बुलडाणा : ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे घेण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिवरा आश्रम हा वादग्रस्त शुकदास महाराजांचा असल्याने, त्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी भूमिका अंनिसने घेतली आहे. तर साहित्य संमेलनाच्या आयोजनात नाक खाजवून अपशकून करू नका, सारस्वतांच्या सन्मानात तुम्हीही सहभागी व्हा, असे आवाहन आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी केले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी नागपुरात पार पडलेल्या बैठकीत हिवरा आश्रम येथे साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी घोषणा महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली. मात्र, हिवरा आश्रम येथे संमेलन भरविण्यास अंनिसचे संस्थापक संघटक श्याम मानव तेसच राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी आक्षेप घेतला आहे. साहित्य संमेलन भोगीदास आश्रमात कशासाठी, असा सवाल श्याम मानव यांनी केला आहे आपल्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की,विवेकानंदांसारख्या विवेकी योग्याचे नाव वापरणाºया, पण प्रत्यक्षात रजनिशांच्या तंबूतील उंट असणाºया ढोंगी शुकदास महाराजांच्या आश्रमात साहित्य संमेलन घेऊन साहित्य महामंडळ साहित्य रसिक जनतेसमोर कोणता आदर्श ठेऊ इच्छिते?नेमका काय आहे वाद?बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे १४ जानेवारी १९६५ रोजी शुकदास महाराज यांनी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. सध्या येथे दोन कृषि महाविद्यालय, निवासी अपंग व कर्णबधीर विद्यालय तसेच कॉन्व्हेंट शाळा चालविली जाते. शुकदास महाराज यांचा पूर्वी अकोला शहरातील सुधीर कॉलनीमध्ये आश्रम होता. अंनिसचे शाम मानव यांनी त्यांच्यावर स्त्री लंपट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शुकदास महाराज यांनी अकोला सोडून हिवरा येथे आश्रमाची स्थापना केली. ४ एप्रिल २०१७ रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.हा तर प्रसिद्धीसाठी खटाटोपविवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू नये, असा मनाई हुकूम २००१ मध्ये अकोल्याच्या सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे. त्या आदेशाचा अवमान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव व त्यांचे सहकारी करत आहेत. अ.भा.साहित्य संमेलनाच्या तोंडावर निव्वळ प्रसिद्धी मिळविण्याचा खटाटोप मानव करत असल्याचा आरोप विवेकानंद आश्रमाचे मुख्य प्रवक्ते तथा सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. याचवेळी त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही दिला.आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी शुकदास महाराज यांनी नाही तर विवेकानंद आश्रमातर्फे महामंडळाकडे अर्ज करण्यात आला होता. हे संमेलन आश्रम घेणार नाही तर ते विदर्भ साहित्य संघ घेणार आहे. आश्रम हे फक्त ठिकाण आहे. तेथे संमेलन होण्याचा आणि महाराजांचा काही एक संबंध नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे संमेलन होणार आहे.- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळसंमेलन वादात गोवणे योग्य नाहीहिवरा आश्रमविषयी पूर्वी वाद झाले असतील, मात्र सध्याची स्थिती पाहणे औचित्याचे ठरेल. स्थळाच्या भूतकाळाशी आता होऊ घातलेल्या संमेलनाचा संबंध जोडणे योग्य नाही. स्थळ पाहणी समितीने अनुकूल प्रतिक्रिया दिल्यानंतर, साहित्य महामंडळाने बहुमताने निर्णय घेतला तो मान्य करायला हरकत नाही.- डॉ. अक्षयकुमार काळे, माजी संमेलनाध्यक्षसर्वांनी विवेकाने निर्णय घ्यावासर्व धर्मातील ढोंगीबाबा निंदनीय व निषेधार्ह आहेत. त्यामुळे अंनिसची भूमिका योग्य आहे. मात्र साहित्य संमेलन स्थळाचा वाद विनाकारण आहे. साहित्य महामंडळ अंधश्रद्ध नाही आणि ज्यांच्या नावावर आश्रम आहे ते विवेकानंद अंधश्रद्ध नाही. त्यामुळे दाभोलकरांची अंनिस, श्याम मानवांची अंनिस व महामंडळाने एकत्रित येऊन विवेकाने याबाबत निर्णय घ्यावा.- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष