त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? एकनाथ शिंदे यांना 'तेव्हा' अटकेची भीती वाटत होती; राऊतांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:17 IST2025-02-23T14:16:34+5:302025-02-23T14:17:35+5:30
...त्याआधी उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे सीमा प्रश्नाचा आणि सीमा भागाचा विशेष कार्यभार होता, तेव्हाही गेले नाही. कारण त्यांना तेव्हा अटकेची भीती वाटत होती, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? एकनाथ शिंदे यांना 'तेव्हा' अटकेची भीती वाटत होती; राऊतांचा निशाणा
एकनाथ शिंदे हे मंत्री असतानाही कधी बेळगावमध्ये गेले नाही. त्यांच्याकडे सीमा भागाचा कार्यभार होता, मंत्री म्हणून. तेव्हा जे गृहस्थ त्या भागात गेले नाहीत, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? मुख्यमंत्री असतानाही गेले नाही. त्याआधी उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे सीमा प्रश्नाचा आणि सीमा भागाचा विशेष कार्यभार होता, तेव्हाही गेले नाही. कारण त्यांना तेव्हा अटकेची भीती वाटत होती, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
यावेळी, गेल्या काही दिवसापासून, कर्नाटक सीमेचा वाद आहे. काल देखील कर्नाटकमध्ये वाद झाला, बसेस जात होत्या महाराष्ट्रातील, त्यांना काळे पासण्यात आले. आता परिवहन मंत्र्यांनी तिकडे जाणाऱ्या बसेस बंद केल्या. तेही म्हणतात की मंत्री असलो तरी आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीयेत. एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यावेळी उठाव केला होता, त्यावेळी देखील आंदोलन केले होते? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, संजय राऊत यांनी वरील भाष्य केले.
एवढेच नाही तर, "कोणता उठाव केला होता? कोणता, कोणता उठाव केला होता? कधी? काय कुठे रेकॉर्ड आहे का? कधी? हा कायम प्रश्न आहे, कधी? आम्ही जेलमध्ये गेलो, आम्हाला अटका झाल्या, अजून आमचे खटले सुरू आहेत. पण जे आंदोलन ते म्हणतात, त्या आंदोलनात जेलमध्ये गेलेल्या ४० लोकांची यादी आहे, त्यात मला एकनाथ शिंदे यांचे नाव कुठेच दिसले नाही. जसे भारतीय जनता पक्षाचे नाव स्वातंत्र्य लढ्यात दिसले नाही, तसेच एकनाथ शिंदेचे आहे. कोणत्याही लढ्यामध्ये, कोणत्याही संघर्षात, तुरुंगात एकनाथ शिंदे यांचे नाव कधी दिसले नाही," अेसही संजय राऊत म्हणाले.
काय घडलं कर्नाटकात? -
कर्नाटकातील बेळगाव येथे शुक्रवारी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली होती. मराठी येत नसल्याने आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा कंडक्टर महादेवप्पा मल्लाप्पा हुक्केरी यांनी केला होता. यानंतर, कन्नड समर्थांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. दरम्यान कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पुणे- बेंगलोर महामार्गावरील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसवर हल्ला करत, एसटी चालकाला कन्नड येते का? असे विचारत मारहाण केली. यानंतर, चालकाला आणि बसला काळे फासण्यात आले होते.