शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

भाकरी आधी फिरविली अन् पुन्हा...; शरद पवारांनी निर्णय फिरविण्याची ३ कारणे कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 06:49 IST

गेल्या तीन दिवसांत झालेल्या वेगवान घडामोडींनंतर आता त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचे ठरविले आहे.

मुंबई - शरद पवार यांनी २ मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा परत घेत पदावर राहणे पसंत का केले असेल याविषयी आता विविध तर्क दिले जात आहेत. भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून करण्याची घोषणा पवार यांनी केली खरी; पण ती तीन दिवसांतच त्यांनी मागे घेतली. या निर्णयाने पवार यांनी काय साधले अन् काय गमावले, याची चर्चाही सुरू झाली आहे. 

नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, भाकरी फिरवली नाही तर ती करपते, असे विधान पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबईतील मेळाव्यात अलीकडेच केले होते. नवीन नेतृत्वाला संधी देणार म्हणजे पवार काय करणार? जयंत पाटील, अजित पवार या ओल्ड गार्डस्ऐवजी नवीन चेहरे समोर आणणार का? या चर्चेला ऊत आला होता. मात्र २ मे रोजी त्यांनी स्वत:च पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून जबरदस्त धक्का दिला.

प्रस्थापितांऐवजी नवीन चेहऱ्यांना  मिळणार संधी? गेल्या तीन दिवसांत झालेल्या वेगवान घडामोडींनंतर आता त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचे ठरविले आहे. पक्षाला उत्तराधिकारी देण्यासह संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर आपला भर असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ पक्षातील प्रस्थापित नेत्यांऐवजी ते आता नवीन चेहऱ्यांना पुढे आणतील, असे मानले जात आहे. 

शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याची ३ कारणे

  1. ते राजीनामा मागे घेणारच होते. मात्र पक्षावर आजही आपलीच पकड असल्याचे त्यांनी राजीनाम्याच्या घोषणेनंतर जो भावनांचा उद्रेक झाला, त्यावरून सिद्ध केले. पक्ष आपल्यासोबत असल्याचे पवार यांना पक्षात वेगळा विचार करणाऱ्यांना दाखवून द्यायचे होते, ते साध्य झाले. 
  2. पवार यांनी आधी राजीनाम्याची घोषणा तर केली, पण नवीन नेतृत्वाच्या हाती पक्ष देण्याची ही वेळ नाही, कालांतराने तसे करता येईल हे त्यांच्या नंतर लक्षात आले. आज पक्षाध्यक्षपद सोडले तर पक्ष फुटेल व त्याचा फायदा इतर पक्षांना होईल, असा अंदाज त्यांना आला असावा. त्यातून त्यांनी आजचा निर्णय घेतला. 
  3. सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्षपद दिले तर ते पक्षात एकमताने स्वीकारले जाईल का, याबाबत शरद पवार यांना शंका होती. सुप्रिया यांना अध्यक्ष केलेही असते तरी पक्षावर अजित पवार यांचाच प्रभाव राहिला असता. त्यातून पक्षात विसंवाद निर्माण झाला असता. लोकसभा, विधानसभा निवडणूक समोर असताना असे चित्र निर्माण होऊ नये, म्हणून पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याचे ठरविले.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळे