शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मी काय लेचापेचा नाहीय! राजकीय आजारपणाच्या टीकेवर अजित पवार गरजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 21:03 IST

राज्याचे वातावरण सध्या वेगळ्या पद्धतीने पहायला मिळत आहे. त्यातून वेगळ्या चर्चा होत आहेत. सत्तेत सहभागी झाल्याचे अजित पवारांनी कारण सांगितले.

राज्याचे वातावरण सध्या वेगळ्या पद्धतीने पहायला मिळत आहे. त्यातून वेगळ्या चर्चा होत आहेत. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. परंतू, तो अधिकार वापरताना इतरांना त्रास होता नये. भावना दुखावणार नाहीत, जाती जातीत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असा सल्ला अजित पवारांनी कोणाचे नाव न घेता दिला. याचबरोबर मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळच्या राजकीय आजारपणाच्या टीकेवरून मी काही लेचापेचा नाही, असा इशारा अजित पवारांनी विरोधकांना दिला. 

मराठा समाजाला वाटतेय त्यांना आरक्षण मिळायला हवे, धनगर समाजाला वाटतेय त्यांना आरक्षण मिळायला हवे, ओबीसी समजाला वाटतेय आमच्या ३५० जाती आहेत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारकडून घेतली जातेय. इतरांच्या आरक्षणाला धक्का न देता राहिलेल्यांना संधी दिली पाहिजे असे सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.

अजित पवार आज कर्जतमध्ये आले होते. यावेळी स्थानिक नेते सुधाकर घारे यांनी काही समस्या मांडल्या. तो धागा पकडून पवारांनी  विरोधात राहून काही काम करता येईल का? निधी मिळेल का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार न सोडता सत्तेत सहभागी झाल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. विचारधारा पक्की ठेवून सत्तेत काम करुन हे सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो. मला डेंग्यू झालेला आणि मी 15 दिवस नव्हतो. पण मला राजकीय आजार झाला, अशी टीका करण्यात आली. पण मी काय लेचापेचा नाहीय, असा इशारा अजित पवारांनी विरोधकांना दिला आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण