शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

"नॉट रिचेबल होण्यापूर्वी श्रीनिवास वनगांनी धाय मोकलून रडत उद्धव ठाकरेंची माफी मागितली; पत्नी म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 11:09 IST

Shrinivas Vanga News : याशिवाय, माझ्या पतीचे काही बरे वाईट झाले तर कुणाला जबाबदार  धरू? असा सवालही वनगा यांच्या पत्नीने केला आहे...

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) हे गेल्या 14 ते 15 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. ते काल सायंकाळी अचानकपणे घरातून निघून गेले. त्यांचे दोन्ही फोनही बंद आहेत. कुटुंबीय तसेच पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. तत्पूर्वी, अर्थात नॉट रिचेबल होण्यापूर्वी त्यांनी धाय मोकलून रडत उद्धव ठाकरे यांची माफीही मागितली. तसेच 'घातकी माणसांच्यासोबत गेलो आणि माझा घात झाला,' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. याशिवाय, माझ्या पतीचे काही बरे वाईट झाले तर कुणाला जबाबदार  धरू? असा सवालही वनगा यांच्या पत्नीने केला आहे.

तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा उद्धव ठाकरे यांची माफी मागताना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्यासारखा प्रामाणिक व्यक्ती, दिलेला शब्द पाळतात, हे माझ्या बाबतीत मला प्रामाणिकपणाने कळते. मी उद्धव ठाकरे यांची माफी मागतो. देवा मला माफ कर. तसेच, घातकी माणसांच्यासोबत गेलो आणि माझा घात झाला आज," असेही वनगा यांनी म्हटले होते. यावेळी ते धाय मोकलून रडत होते. ते टीव्ही ९ सोबत बोलत होते.

...तर मी कुणाला जबाबदार  धरू? -तत्पूर्वी, श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या की, "ते (श्रीनिवास वनगा) कालपासून जेवतच नाहीयत, काही बोलतही नाहीयेत, वेड्यसारखे वागतात, आत्महत्या करणार असे बोलतात, माझे आयुष्य संपूण गेले असे म्हणतात. उद्धव साहेबांना देव मानत होते. त्यांचे सारखे नाव घेतात आणि सांगतात की माझी चूक झाली, मी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला शब्द दिलेला." एवढेच नाही तर, "त्यांनी 39 आमदारांचे पुनर्वसन केले. माझ्या पतीचे काय चुकले? त्यांचे काही बरे वाईट झाले तर मी कुणाला जबाबदार  धरू?" असा सवालही यावेळी वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palgharपालघरShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024