मुंबईसह देशभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

By Admin | Updated: January 1, 2017 05:00 IST2017-01-01T00:12:38+5:302017-01-01T05:00:20+5:30

'घडाळ्यात रात्री बाराचा टोला पडला...आणि... एकच जल्लोष...गुड बाय 2016... वेलकम 2017!' नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघी तरुणाई सरसावल्याचे चित्र दिसून आले.

Welcome to New Year celebrations across the country including Mumbai | मुंबईसह देशभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

मुंबईसह देशभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 01 - 'घडाळ्यात रात्री बाराचा टोला पडला...आणि... एकच जल्लोष...गुड बाय 2016... वेलकम 2017!' नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघी तरुणाई सरसावल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळपासून सुरू झालेला नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता. रात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने आसमंत उजळून गेला.
मुंबईत सीएसटी, गेटवे ऑफ इंडिया, नरीमन पाईंन्ट आणि सी फेस या ठिकाणी घोळक्या घोळक्याने तरुण-तरुणी कल्ला करीत, एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत गळाभेट घेत होते. या ठिकाणी तरुणांची एकच झुंबड दिसून येत होती. आकर्षक टोप्या, रंगीबेरंगी गॉगल्स घालून सेल्फीही काढून घेत होते. तरुणांप्रमाणोच तरुणीही ग्रुप-ग्रुपने फिरत जल्लोष करीत होत्या. याचबरोबर  हृदयाचे आकार असलेले रंगीबेरंगी फुगे, फुले, तसेच शोभेच्या वस्तूंनी रस्ते फुलून गेले होते. तर, हॉटेल्समध्येही तरुणांनी गर्दी केली. रस्त्यावरील विविध खाद्यपदार्थाचा स्वाद घेत तरुणाईने जल्लोष केला. शहरात सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची धूम सुरू असताना शहरातील सोसायट्यांध्येही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, दिल्ली, कोलकाता, भोपाळ, गोवा, पुणे या ठिकाणांसह देशभरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. 
न्युझीलंड, दुबई, ऑस्ट्रेलिया या ठिकाणीही मोठ्या उत्साहाच फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
 
 

(फोटो - दत्ता खेडेकर, अतुल कासारे)

Web Title: Welcome to New Year celebrations across the country including Mumbai