शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

सीट बेल्ट लावा, जीव वाचवा; विविध यंत्रणांकडून महत्त्व अधोरेखित, नियमांचे काटेकोर पालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2022 16:45 IST

सीट बेल्ट म्हणजे भीषण अपघातात जीवन आणि मृत्यू यांच्यातील सीमारेखा आहे. या बेल्टमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे.

नितीन जगताप -

मुंबई : देशात रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. रस्ते अपघातात नाहक जाणारे हे बळी रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वेळोवेळी अनेक नियम तयार केले आहेत. तसेच कायदे आणखी कठोर केले आहेत. त्याचबरोबर गाड्यांमध्ये सीट बेल्ट घालणे अनिवार्य केले आहे. सीट बेल्ट म्हणजे भीषण अपघातात जीवन आणि मृत्यू यांच्यातील सीमारेखा आहे. या बेल्टमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही सीट बेल्टकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अपघातात मृत्यू होतो.  वाहनाच्या चालकाच्या हाती गाडीची स्टेअरिंग असते, ती केवळ गाडी चालवण्यासाठी नव्हे. गाडी सुरू करण्यापूर्वी  सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट घातला आहे हे तपासायला हवे. कारण बऱ्याच अपघातात वाहन चालक आणि त्याच्या शेजारील व्यक्ती सीट बेल्ट लावते पण पाठीमागील प्रवासी सीट बेल्टकडे दुर्लक्ष करतात. मात्र ते प्राणघातक ठरते. 

वैयक्तिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे कायदा हा शिक्षा करण्यासाठी नसून शिस्त लावण्यासाठी आहे. काहीजण  केवळ कारवाई होईल म्हणून सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करतात. पण सीट बेल्ट आणि हेल्मेट हे त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी आहे त्याचा विचार केला पाहिजे.  शहरात असलो की सीटबेल्ट वापरणार नाही केवळ महामार्गावर वापरेन हे चुकीचे असून गाडीत बसले की सीट बेल्टचा वापर व्हावा.- डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्तपाठीमागे बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट सक्तीची गरज वाहन चालक आणि त्याच्या शेजारील व्यक्ती शिवाय पाठीमागे बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट घातला पाहिजे याचा वाहन कायद्यात समावेश केला आहे. पण वाहन चालक आणि त्याच्या शेजारील व्यक्तीवर सीट बेल्टची कारवाई केली जाते. मात्र पाठीमागे बसणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. पाठीमागे बसणाऱ्यांनाही  सीट बेल्ट सक्तीची गरज आहे. - रणजित गाडगीळ, वाहतूक तज्ज्ञ

(स्रोत : सेव्ह लाइफ फाऊंडेशन अभ्यास २०१९-२०)

वर्ष     घटना     मृत्यू     जखमी२०२१    ४०३११६    १५५६२२    ३७१८८४२०२०     ३६६१३८    १३१७१४    ३४८२७९२०१९    ४४९००२    १५११३    ४५१३६१२०१८     ४६७०४४    १५१४१७    ४६९४१८२०१७     ४६४९१०    १४७९१३    ४७०९७५२०१६    ४८०६५२    १५०७८५    ४९४६२४

विना सीट बेल्ट २०० रुपये दंड महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी १००० रुपये दंड होता तो ५००० रुपये करण्यात आला आहे. पण वाहन चालविताना सीटबेल्ट घालून नसल्यास १००० रुपये दंड आकारला जायचा. परंतु नव्या कायद्यात दंडाच्या रकमेत घट करून ती २०० रुपयांवर आणली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातcarकारroad safetyरस्ते सुरक्षा