जे ओबीसींना मिळतं ते सगळं आम्हाला मिळालंच पाहिजे; राजकीय आरक्षणावर जरांगे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:31 PM2023-11-08T13:31:15+5:302023-11-08T13:32:55+5:30

"आमच्या आहेत, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात. जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे," असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

We must get everything that OBCs get; Jarange spoke clearly on political reservation | जे ओबीसींना मिळतं ते सगळं आम्हाला मिळालंच पाहिजे; राजकीय आरक्षणावर जरांगे स्पष्टच बोलले

जे ओबीसींना मिळतं ते सगळं आम्हाला मिळालंच पाहिजे; राजकीय आरक्षणावर जरांगे स्पष्टच बोलले


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एकवटला आहे. संपूर्ण मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. याला विरोध म्हणून ओबीसी समाजाचे नेतेही आता समोर येऊ लागले आहेत. यातच आता, "आमच्या आहेत, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात. जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे," असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
 
जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे -
जरांगे म्हणाले, "जे आमचच्या हक्काचे आहे ते आम्हाला मिळणारच ना. पण त्यांनी त्यांची भूमिका निश्चित करावी की, त्यांचा विरोध नेमका कशाला आहे? आम्ही कसे सांगायचे? आमचे आहे, ते आम्हाला मिळणारच आहे. पूर्वीपासून ओबीसी असल्याने सर्व हक्क आम्हाल मिळणारच आहेत. राज्यावर आणि केंद्रावरही." यावेळी, पत्रकारांनी राजकीय आरक्षणासंदर्भा प्रश्न विचारला असता, जरांगे म्हणाले. "आमच्या आहेत त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात. जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे."

मराठा समाजाचे सर्वाधिक वाटोळे समाजाच्याच नेत्यांनी केले -
मराठा समाजाचे सर्वाधिक वाटोळे मराठा समाजाच्याच नेत्यांनी केले. मुख्यमंत्री असले म्हणून काय झाले. आमचे वाटोळे करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले, मंत्री व्हायला लागले. त्यांनी साथ दिली नाही, म्हणून तर आमचे एवढे वर्षं आरक्षण होते, ते त्यांनीच घालवले. त्यांनीच लोकांना वाटप करून टाकले, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

एवढेच नाही, तर 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर गेल्या 20 वर्षांपासून कोण-कोण ओबीसीमध्ये आहेत त्यांची नावे आणि आपले आरक्षण कुणी दिले? त्यांची नावेही आम्ही समोर आणणार आहोत, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला आहे.

Web Title: We must get everything that OBCs get; Jarange spoke clearly on political reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.