शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sunetra Pawar: आपण दोघी समदुःखी; सुनेत्रा पवारांनी विदीप जाधवांच्या पत्नीचे केले सांत्वन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:58 IST

Sunetra Pawar Meet Vidip Jadhav’s Wife: बारामती येथील दुर्दैवी विमान दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या अपघातात राज्याने आपल्या लाडक्या नेत्याला, अजितदादांना गमावलं, तर जाधव कुटुंबाने आपला आधार, विदीप जाधव यांना गमावले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे जाऊन दिवंगत सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क तरडगाव (जि. सातारा) : ‘जसे तुझे पती तुला दिसत नाहीत. तसे माझे पण पती मला दिसत नाहीत. ते माझ्याजवळ नाहीत. दोघांनी जगाचा निरोप घेतला आहे. आपण दोघी समदुःखी आहोत,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांचे सुरक्षारक्षक दिवंगत विदीप जाधव यांची पत्नी संध्या यांचे सांत्वन केले. पवार कुटुंबीय हे जाधव कुटुंबीयांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देत त्यांनी धीर दिला. 

बारामती येथे बुधवारी झालेल्या विमान दुर्घटनेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही समावेश आहे. यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी दुपारी तरडगाव येथे आल्यानंतर थेट जाधव यांच्या घरी गेल्या.  विदीप यांची मुलगी नेत्रा व मुलगा अद्विक यांच्या पाठीवरून सुनेत्रा पवार यांनी मायेने हात फिरवला. यावेळी विदीप यांचे वडील दिलीप, चुलते संजय यांच्याशी चर्चा करीत सांत्वन केले. तर पत्नी संध्या यांना धीर दिला. 

१५ मिनिटे संवाद 

घरातील मंडळीची माहिती घेत सुनेत्रा यांनी सर्वांची विचारपूस केली. जाधव अन् पवार कुटुंबीय एकच आहेत. मुलांचे शिक्षण व पत्नीच्या नोकरीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. दुखवट्याचा कालावधी झाल्यावर तुम्ही माझ्याकडे भेटावयास या, असे त्यांनी सांगितले. एका खोलीत पंधरा मिनिटे सुरू असलेल्या चर्चेदरम्यान कोणाला आत सोडले जात नव्हते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar consoles widow of Ajit Pawar's deceased bodyguard.

Web Summary : Sunetra Pawar consoled the widow of Ajit Pawar's bodyguard, who died in a plane accident, expressing shared grief and offering unwavering support for the family's future needs, including education and employment.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण