शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"छापेमारीचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही...:, बारामती ॲग्रोवरील ईडीच्या कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:31 IST

बारामतीतील जनतेनं माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे आयुष्यभर मी त्यांची ऋणी राहिल. त्यामुळे, माझं तिकीट कापण्याचा का प्रयत्न करत आहात?" अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी ( ५ जानेवारी ) सकाळी सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. विशेष म्हणजे, रोहित पवार हे परदेशात असताना बारामती ॲग्रोवर ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

ईडी आणि सीबीआयच्या चौकशी सुरु असलेले ९५ टक्के लोक हे विरोधी पक्षातील आहेत. त्यामुळे छापेमारीचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. ही पहिली वेळ नाही. यापूर्वी रजनी इंदुलकर, स्मिता पाटील आणि विजया पाटील या माझ्या तीन बहिणींचा राजकारणाशी लांब लांबपर्यंतचा संबंध नसताना सुद्धा त्यांच्या घरावर ईडीची छापेमारी झाली आहे. आता रोहित पवारांवर ईडीची छापेमारी होत आहे. त्यामुळे हे दुर्दैव असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, शरद पवार बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. यावरही सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "बारामती हा माझा मतदारसंघ नसून कुटुंब आहे. १५ वर्षे झालं मी बारामती मतदारसंघात काम करत आहे. बारामतीतील जनतेनं माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे आयुष्यभर मी त्यांची ऋणी राहिल. त्यामुळे, तुम्ही माझं तिकीट कापण्याचा का प्रयत्न करत आहात?" अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

शुक्रवारी (दि.५) सकाळी  पिंपळी (ता. बारामती) येथील बारामती ॲग्रो कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी माहिती घेण्यास तळ ठोकून आहेत. मात्र, या छापेमारीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. तसेच, ईडीच्या अधिकाऱ्यांचा देखील संपर्क होऊ शकलेला नाही.

छापेमारीनंतर रोहित पवारांचे ट्विटईडीच्या छापेमारीनंतर रोहित पवार यांनीही 'एक्स' अकाउंटवर सूचक असे ट्विट केले आहे. "हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल," असे रोहित पवारांनी म्हटले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस