"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:16 IST2025-07-09T17:11:41+5:302025-07-09T17:16:15+5:30
अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही. देवणार डंपिंग ग्राऊंडवर अदानींनी टॉवर्स बांधावीत आमचे काही म्हणणे नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले...

"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आमच्यावर नेहमीच आरोप केला जातो की, शिवसेनेने मराठी माणसाकरिता काय केले? माझे सरकार जर यांनी पाडले गेले नसते, तर सहाजिकच आहे की, मी या सर्व गिरणी कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांनाही घरे द्यायला सुरुवात केलीच होती. पण मुख्यतः गिरणी कामगारांना आणि पोलिसांनाही मुंबईत घरे दिली असती. पोलिसांना तर मिळत आहेतच. पण आणखीही दिली असती, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत, आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षक आणि गिरणीकामगारांच्या आंदोलनाच्या मुद्द्यांवर पत्रकारासोबत बोलत होते.
ठाकरे म्हणाले, "आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षक आणि गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला घरे द्या, अशी मागणी करणारे गिरणीकामगार या दोघांचेही आंदोलन सुरू आहे. मला एका गोष्टीचे वैशम्य वाटले, "महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन इकडे सुरू आहे. लोकप्रतिनिधी इकजे आले आहेत. मात्र लोक वर्षानुवर्षे त्यांच्या व्यथा मांडत आहेत, ते मात्र आजाद मैदानात आंदोलन करत आहेत.
ठाकरे पुढे म्हणाले, "शिक्षकांनाही आम्ही आश्वासन दिले आहे की, आम्ही तुमच्या लढ्यात तुमच्या सोबत आहोत. गिरणी कामगारांचा तर प्रश्नच नाही. कारम गिरणी कामगारांचा संप तांत्रिकदृष्ट्या बघितलं, तर अजूनही सुरूच आहे. त्यावेळी गिरणी कामगारांच्या तोंडाला पाणे पुसण्यात आली. वन थर्ड, वन थर्ड, वन थर्ड हा जो काही प्रकार केला गेला, यामुले गिरणी कामगारांची घरे तर गेलीच. गिरण्यांच्या जमिनीही गेल्या. गिरण्यांच्या जागांवर टॉवर्स आणि मॉल्स उभे राहिले आणि ज्या गिरणी कामगारांनी रक्त सांडून घाम गाळून ही मुंबई उभी केली, नव्हे संयुक्तमहाराष्ट्राच्या लढ्यात आंदोलन करून मिळवून दिली. तो गिरणी कामगार आज स्वतःच्याच मुंबईत बेघर झाला आहे."
"आज आमची हीच मागणी आहे की, एकीकडे गिरणी कामगार मुंबई बाहेर फेकला जातो. त्यांना शेलू-वांगडीला पाठवले जाते आणि दुसरीकडे आदानीला धारावीची जमीन दिली जात आहे. आमची आग्रहाची मागणी आहे की, गिरणी कामगारांना धारावीत घरे द्या आणि आदानीची टॉवर्स शेलू-वांगडीला उभी करा. आदानीने देवनार डंपिंग ग्राउंडवर टॉवर्स बांधावेत किंवा त्यांना मिळालेला टी.डी.आर. शेलू-वांगडीला वापरावा. मात्र, ज्यांनी मुंबई मिळवून दिली, त्या गिरणी कामगारांना तेथे पाठवण्याऐवजी, त्यांना धारावीत घरे द्या. आदानीला कुर्ला मदर डेरीची जमीन दिली आहे, तिथे गिरणी कामगारांना घरे द्या. आणि अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही. देवणार डंपिंग ग्राऊंडवर अदानींनी टॉवर्स बांधावीत आमचे काही म्हणणे नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.