शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

अंतिम वर्षाच्या परीक्षेमुळे निर्माण होणाऱ्या कायदेशीर पेचवर " असा " निघू शकतो मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 11:09 PM

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विषय राजकीय बनला आहे...

ठळक मुद्देअंतिम वर्षाच्या परीक्षेवर कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यताराज्यपाल व मुख्यमंत्री यांनी एकत्रितपणे चर्चा करून यावर निर्णय घेण्याची आवश्यकता

पुणे: विद्यापीठ कायद्यानुसार राज्यपाल सर्व विद्यापीठांचे प्रमुख असून त्यांना शैक्षणिक निर्णय घेण्याचे सर्वाअधिकार आहेत.तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मुख्यमंत्री विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात सूचना देऊ शकतात. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत याबाबतचा एक नवा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी एकत्रितपणे चर्चा करून यावर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी 'जीबीव्हीसी'ची बैठक हा पर्याय असू शकतो,असे मत शिक्षण व विधी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विषय राजकीय बनला आहे. राज्यातील कुलगुरू बरोबर घेतलेल्या बैठकीनंतर कायदेशीर बाबी तपासून अंतिम वर्षाच्या परीक्षेला बाबत निर्णय घेतला जाईल ,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर केले जातील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु, विद्यापीठांचे कुलपती म्हणून सर्व विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा घेतल्या जातील, असे राज्य शासनाला कळविले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी आणि विद्यापीठ कायद्यातील तरतुदी तपासाव्या लागणार आहेत.परंतु, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जॉईंट बोर्ड ऑफ व्हॉइस चान्सलर्सची (जीबीव्हीसी) बैठक बोलविली यास त्यातून मार्ग निघू शकतो.

कायद्याचे अभ्यासक अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मुख्यमंत्री विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात आदेश देऊ शकतात. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य शासनाला परीक्षेसंदर्भातील वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करता आला असता. सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर केल्यानंतरही ज्यांना परीक्षा द्यायची आहे. त्यांना परीक्षा देण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न निर्माण होतो.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅ​​​​​​​ड. एस. के. जैन म्हणाले, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल यांनी काम करावे. हे जरी खरे असले तरी; कुलपती म्हणून राज्यपालांचे विशिष्ट स्थान आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर मध्यम मार्ग निघाला असता. सरासरी गुण देऊन निकाल जाहीर केल्यामुळे पुढील काळात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याबाबत जीबीव्हीसी घेऊन लोकप्रिय नाहीतर विद्यार्थ्यांच्या भले होईल,असा निर्णय घ्यावा.

विद्यापीठ विकास मंचचे प्रांत प्रमुख डॉ.ए.पी.कुलकर्णी म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर परीक्षा घ्यावी.परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. जीबीव्हीसीमध्ये यावर मार्ग काढता येऊ शकतो.---------------------अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात निर्माण झालेल्या एकूण परिस्थितीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ऑनलाइन जीबीव्हीसी बोलवून सर्व कुलगुरू व राज्य शासनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बरोबर चर्चा करणे योग्य होईल. जीबीव्हीसीच्या बैठकीमध्ये कोरोनाची परिस्थिती, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य याबाबत सकारात्मक चर्चा करून मार्ग काढता येऊ शकतो.- डॉ. वासुदेव गाडे, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ--------राज्यपाल हे जीबीव्हीसीचे अध्यक्ष असतात. जीबीव्हीसीमध्ये सर्व कुलगुरू तसेच मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री ,शिक्षण सचिव यांच्याबरोबर चर्चा करता येऊ शकते. जेबीव्हीसीला एक विशिष्ट स्थान असल्यामुळे गांभीर्याने चर्चा करून एका दिवसात अंतिम वर्षाच्या परीक्षेवर मार्ग काढला जाऊ शकतो.-डॉ.आर.एस.माळी ,माजी कुलगुरू ,जळगाव विद्यापीठ----------जेबीव्हीसी म्हणजे काय?राज्यातील उच्च शिक्षण विषयक बाबींवर जेबीव्हीसीमध्ये चर्चा केली जाते. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आणि राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली जेबीव्हीसीच्या बैठका पार पडल्या आहेत. राज्यपाल हे 'जीबीव्हीसी' चे पदसिद्ध अध्यक्ष असून या बैठकीला सर्व कुलगुरू मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री, राज्याचे प्रधान सचिव, उच्च शिक्षण विभागाचे सचिव ,आदी उपस्थित असतात. त्यामुळे जेबीव्हीसीमधून परीक्षेचा पेच सोडविला जाऊ शकतो.--------* मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये राज्यातील केवळ दोन कुलगुरूंनी परीक्षेबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. इतर कुलगुरूंनी राजकीय दबावाखाली बोलणे टाळले, असे बोलले जात आहे. मात्र 'जी​​​​​​​बीव्हीसी'मध्ये मोकळेपणाने चर्चा होऊ शकते.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठState Governmentराज्य सरकारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीexamपरीक्षाStudentविद्यार्थीUddhav Thackerayउद्धव ठाकरे