शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोंडीवर जलमार्गाची मात्रा; मुंबई महानगरात ३४० किमीपर्यंत जलमार्ग वाढवणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्यायी, पर्यावरणपूरक व स्वस्त उपाय म्हणून सध्याचे १२५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्यायी, पर्यावरणपूरक व स्वस्त उपाय म्हणून सध्याचे १२५ किलोमीटरचे जलमार्गाचे जाळे वाढवून ते ३४० किलोमीटरपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. यासाठी विद्यमान २१ जलमार्गांवरील २० टर्मिनल्सचे आधुनिकीकरण व ११ नव्या जलमार्गांवर २४ नवीन टर्मिनल्ससाठी ६ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

जलमार्गाचा विस्तार केल्यामुळे सध्या वार्षिक सुमारे १ कोटी ६० लाख असलेली प्रवासी संख्या २०३१पर्यंत ७ कोटी ३९ लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईतील रेडिओ क्लब येथे नवीन जेटी उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला, असून तो डिसेंबर २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय महाराष्ट्र जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती व जहाज पुनर्वापर धोरणांतर्गत मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्यात येणार आहे. ग्रीनफिल्ड जहाज बांधणी क्लस्टर व जहाज प्रकल्पासाठी आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे उभारण्यात येत असलेल्या बंदर प्रकल्पासाठी राज्याचा वाटा म्हणून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथील मच्छीमारांच्या अडचणी लक्षात घेऊन सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्य बंदर विकसित करून मच्छीमार बोटींसाठी सुरक्षित थांबा, वादळी वाऱ्यांपासून संरक्षण तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

१४,९०७ कोटींच्या उपनगरी रेल्वे प्रकल्पाला मंजुरीमुंबई नागरी परिवहन प्रकल्प (३-ब) अंतर्गत १४ हजार ९०७ कोटी रुपयांच्या उपनगरी रेल्वे प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत बदलापूर – कर्जत, आसनगाव – कसारा आणि पनवेल – वसई यादरम्यान सुमारे ६९ किलोमीटर लांबीचा नवीन उपनगरी रेल्वे कॉरिडॉर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पात राज्य सरकार ५० टक्के आर्थिक सहभाग देणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai to expand waterways, easing traffic congestion with new routes.

Web Summary : Mumbai's waterways will expand to 340 km from 125 km to ease traffic. This ₹6,600 crore project includes modernizing 20 terminals and building 24 new ones. Passenger numbers are expected to rise significantly. Suburban rail projects worth ₹14,907 crore have also been approved.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026