शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराची पाण्याची समस्या अखेर संपणार

By admin | Updated: July 13, 2016 14:35 IST

गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी उघडीप घेतली

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 13 - गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी उघडीप घेतली. खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये सुमारे 12.90 टीएमसी (45 टक्के ) पाणीसाठा तयार झाला असून हे पाणी शहरासाठी राखीव ठेवल्यास पुढील वर्षभर पुरेल एवढे आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत या चारही धरणांमध्ये अवघा 7.10 टीएमसी पाणीसाठा होता. दरम्यान, सोमवार (दि. 13) पासून खडकवासला धरणातून सुरू करण्यात आलेला नऊ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी अकरा वाजता 4 हजार क्यूसेक करण्यात आला आहे. पुणे शहराला दररोज एकवेळ पाणी पुरवठा करण्यासाठी वर्षभर तब्बल 13 टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने आॅक्टोबर 2015 अखेर पर्यंत ही धरणांमध्ये अवघा 15 टीएमसी (50 टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून आधी एकवेळ नंतर दिवसआड पाणी कपातीचा सामना पुणेकरांना करावा लागला होता. त्यातच यंदा जून महिना संपूनही पाऊस न पडल्याने या चारही धरणांमध्ये अवघा 7 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे ही कपात वाढण्याचे संकट ओढावले होते. मात्र, 2 जुलैपासून या चारही धरणांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अवघ्या 12 दिवसांमध्ये पाणीसाठा 45 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे या पावसाने तूर्तास पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.