शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी विदर्भाचा सुकतोय घसा, व-हाडात सर्वाधिक बिकट स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 20:40 IST

राज्यातल्या सहा प्रादेशिक विभागांपैकी चार विभागात गेल्या वर्षीपेक्षा  यावर्षी जलसाठ्याची स्थिती बरी असली तरी विदर्भवासीयांचा घसा आताच कोरडा पडत आहे. त्यात पश्चिम विदर्भातल्या (व-हाड) पाच जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे.

 - मनोज ताजने  

गडचिरोली  - राज्यातल्या सहा प्रादेशिक विभागांपैकी चार विभागात गेल्या वर्षीपेक्षा  यावर्षी जलसाठ्याची स्थिती बरी असली तरी विदर्भवासीयांचा घसा आताच कोरडा पडत आहे. त्यात पश्चिम विदर्भातल्या (व-हाड) पाच जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे या विभागात उन्हाच्या तीव्र झळा सहन करत पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. आजच्या स्थितीत राज्यातील मोठ्या, मध्यम व लघुप्रकल्पांमिळून सरासरी उपयुक्त जलसाठा ४१.९२ टक्के आहे. गेल्यावर्षी याच तारखेला राज्यात ३५.२३ टक्के जलसाठा होता. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा काहीशी बरी स्थिती दिसत असली तरी विदर्भात मात्र हे चित्र उलट आहे. विदर्भातील नागपूर विभागात गेल्यावर्षी २०.८१ टक्के जलसाठा होता, तो यावर्षी १९.९१ टक्के आहे. अमरावती विभागात गेल्यावर्षी ३२.२५ टक्के जलसाठा होता तो आता अवघा २१.३१ टक्के आहे. त्यामुळे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात विदर्भात पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ही स्थिती सर्वांचीच चिंता वाढविणारी आहे.उन्हाळ्यात मोठ्या प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्यासोबतच उन्हाळी पिकांचेही नियोजन केले जाते. पण पिण्यासाठीच पाणी नाही तर पिकांना कुठून देणार? अशी स्थिती आहे.  विदर्भात मोठ्या प्रकल्पांपैकी बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, गडचिरोली जिल्ह्यातील दिना, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ही जलाशये कोरडी झाली असून त्यात शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. काही दिवसात इतर जलाशये रिकामी होतील.

७ मोठ्या प्रकल्पात १० टक्केपेक्षा कमी साठाअकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प (९.१९ टक्के), बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा (० टक्के), यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती (८.८४ टक्के), इसापूर (३.९३ टक्के), नागपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द (१०.०३ टक्के), गडचिरोली जिल्ह्यातील दिना (० टक्के) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा (० टक्के) या ७ जलाशयांमध्ये १० टक्केपेक्षा कमी जलसाठा आहे.

टॅग्स :WaterपाणीVidarbhaविदर्भDamधरणMaharashtraमहाराष्ट्र