शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Washim ZP Election Results: वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी; वंचितला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 16:00 IST

काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 'होमग्राऊंड'मध्ये 'जनविकास'

ठळक मुद्देकाँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 'होमग्राऊंड'मध्ये 'जनविकास'

वाशिम : वाशिमजिल्हा परिषदेच्या १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांतील पोटनिवडणुकीचा निकाल ६ ऑक्टोबर रोजी जाहिर झाला असून, जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं (१४ जागा) बाजी मारली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दोन जागा कमी झाल्या तर काँग्रेसच्या एका जागेत वाढ झाली.

जिल्हा परिषदेच्या १४ गटांत ६९ व पंचायत समितीच्या २७ गणांत १२४ उमेदवार नशिब आजमावत होते. ६ ऑक्टोबरला मतमोजणी झाली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीनं पाच जागा पटकाविल्या. यामध्ये तत्कालीन जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, तत्कालीन सभापती शोभा गावंडे यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दोन जागा कमी झाल्या असून, त्यांना दोन जागेवर विजय मिळाला. काँग्रेसने एकमेव दाभा गटाची जागा गमावली असली तरी प्रतिष्ठेच्या काटा व कवठा गटात दणदणीत विजय मिळविला. सेनेचे तत्कालीन जि.प. सभापती विजय खानझोडे यांच्या पत्नीला पराभवाला सामोरे जावे लागले, तर दुसरीकडे सेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी विजय मिळविल्याने पोटनिवडणुकीत सेनेचे नुकसान वा फायदा झाला नाही.

भाजपाने दोन्ही जागा कायम राखल्या, तर जनविकास आघाडीला कवठ्याची एक प्रतिष्ठेची जागा गमवावी लागली. अपक्ष उमेदवाराने एक जागा कायम राखली. या पोटनिवडणुकीत भर जहॉगीर, कवठा, काटा, दाभा व उकळीपेन गटात परिवर्तन घडून आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या होमग्राऊंडमध्ये जनविकास आघाडीच्या पूजा भूतेकर यांनी विजय मिळविला.

वाशिम जिल्हा परिषद

एकूण जागा १४निकाल जाहिर १४

 (विजयी उमेदवार/पक्ष)

१)आसेगाव सर्कल : चंद्रकांत ठाकरे (राकाँ )२) कंझरा सर्कल - सुनिता कोठाळे (राकाँ)३) दाभा सर्कल - राजेश राठोड ( राकाँ)४) काटा सर्कल - संध्याताई विरेंद्र देशमुख (काँग्रेस)५) पार्डी टकमोर - सरस्वती चौधरी (अपक्ष)६) उकळीपेन - सुरेश मापारी (सेना)७) कवठा सर्कल - वैभव सरनाईक (काँग्रेस)८) गोभणी - पूजा भुतेकर, (जनविकास)९) भर जहागीर - अमित बाबाराव खडसे (राकाँ)१०) कुपटा -  उमेश ठाकरे (भाजपा)११) तळप बु. सर्कल - शोभा गावंडे (राकॉं)१२) फुलउमरी - सुरेखा चव्हाण,  (भाजपा)१३) पांगरी नवघरे सर्कल - लक्ष्मी सुनील लहाने ( वंचित आघाडी)१४) भामदेवी सर्कल :वैशाली प्रमोद लळे (वंचित आघाडी)

पोटनिवडणूक झालेल्या १४ गटातील पक्षीय बलाबल

पक्ष      आता    २०२० मध्ये 

राकाँ        ०५      ०३काँग्रेस      ०२      ०१   सेना         ०१      ०१भाजपा     ०२      ०२वंचित        ०२      ०४जनविकास ०१     ०२अपक्ष        ०१      ०१

जि.प.पक्षीय बलाबल (एकूण जागा : ५२)

पक्ष        आता      २०२०राकाँ        १४        १२काँग्रेस      ११        ०९वंचित        ०६        ०८जनविकास ०६       ०७भाजपा       ०७      ०७शिवसेना     ०६       o६स्वाभिमानी  ०१      ०१अपक्ष         ०१       ०२

टॅग्स :washimवाशिमZP Electionजिल्हा परिषदNCPराष्ट्रवादी काँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी