पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला होता. येत्या २४ तासात दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेल्या २४ तासात कोकणात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात पन्हाळा, शिरोळा, शिरोळ येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ४ सप्टेंबर रोजी दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.५ व ६ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.़़़़़़़़़़़़़पालघर, ठाणे, जळगाव जिल्ह्यात ४ सप्टेंबर रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रायगड, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात ४ व ५ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे.पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील चार दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.तसेच घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 20:22 IST
येत्या २४ तासात दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
ठळक मुद्दे५ व ६ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता