शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

नवी मुंबई, रायगड, पालघरला पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 10:37 AM

Rain warning in mumbai, thane, palghar मुंबईसह ठाणे जिल्ह्यात वरुणराजा बरसला. मागील काही दिवसांपासून अधूनमधून बरसणाऱ्या पावासाने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ रायगड/ पालघर : मागील काही दिवसांपासून अधूनमधून बरसणाऱ्या पावासाने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली.  आता मुंबईसह अन्य जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील २ दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ठाणे शहरात साचले पाणीठाणे शहरातील गटारे व नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्याने पाणी तुंबले होते. वर्तकनगरात घराची शेड कोसळली आहे. यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली.  

रायगडमध्ये पावसाचे धुमशानअलिबाग - रायगड जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी जास्त पाऊस पडला.  राेहा तालुक्यातील कवाळटे केळघर येथे दरड काेसळली. त्यामुळे राेहा आणि मुरुड तालुक्यातील  दळणवळणचा मार्ग बंद झाला. अलिबाग येथे सर्वाधिक १०४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. 

पालघरमध्ये दिवसभर संततधारपालघर : वसई-विरारसह जिल्ह्यामध्ये गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावली. दुपारपर्यंत ही संततधार कायम होती. या पावसामुळे वसई-विरारच्या अनेक भागांत पाणी तुंबले होते.

नवी मुंबईत ७६ मि.मी. पावसाची नोंदनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात गुरुवारी पावसाची संततधार सुरू होती. दिवसभरात ७६ मिमी पावसाची नोंद झाली असून दोन ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. नवी मुंबईत पहाटेपासून सायंकाळपर्यंत पाऊस सुरुच होता. 

मुंबईत झोडपधारांचा माराnमुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी ३ ते ५ या वेळेत कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांना अक्षरश: धडकी भरविली. विशेषत: मुंबईच्या उपनगरातील सखल भागात पाणी साचते की काय, अशी स्थिती निर्माण झाली हाेती. मात्र सायंकाळी ५ नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडील नोंदीनुसार, १६ जूनच्या सकाळी ८ वाजल्यापासून १७ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १०२ मिलीमीटर पाऊस नाेंदवण्यात आला. तर एकूण ५ ठिकाणी बांधकामाचा भाग काेसळला. 

 

टॅग्स :Rainपाऊस