शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरीत दिवसभर जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 20:26 IST

मध्य महाराष्ट्रात जोरदार तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

ठळक मुद्देपुण्यात मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता

पुणे : गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र अद्यापही कायम असल्याने पश्चिम किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्रात जोरदार तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पुढील तीन दिवस कोकणातील सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची कोकणासह शक्यता असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील माथेरान ९०, जव्हार, सुधागड पाली ८०, बेलापूर, कर्जत, खालापूर, रोहा, तलासरी ७०, अलिबाग,पालघर, विक्रमगड, वाडा ६०, भिरा, कल्याण, कणकवली, पनवेल, पोलादपूर,सावंतवाडी, वैभववाडी, वसई ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. याबरोबर अनेकठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला होता.

मध्य महाराष्टात महाबळेश्वर १२०, इगतपुरी ११०, वेल्हे ९०, गगनबावडा, राधानगरी ८०, जावळी मेधा ५०, आजरा, हर्सुल, पेठ, त्र्यंबकेश्वर ४०,चंदगड, ओझर, ओझरखेडा, पन्हाळा, शाहूवाडी, वडगाव मावळ, ३० मिमी पाऊस झाला होता. मराठवाड्यात कोरडे हवामान होते. विदर्भात गोंदिया, गोरेगाव, मोहाडी, रामटेक ५०, सालेकसा ४०, आष्ट्री,भामरागड, धानोरा, खरंगा, सडक अर्जुनी, तिरोरा, वरुड ३० मिमी पाऊस झाला होता.घाटमाथ्यावरील लोणावळा (टाटा) १८०, अम्बोणे १५०, वळवण १००, शिरगाव, खोपोली, धरावी ७०, दावडी, डुंगरवाडी ६०, ठाकूरवाडी, वाणगाव, भिरा येथे ५०मिमी पावसाची नोंद झाली होती.

८ ते ११ जुलै दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९, १० व ११ जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीजिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ जुलै रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचाइशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातहलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

रत्नागिरीत दिवसभर जोरदार पाऊसमंगळवारी दिवसभर तब्बल १३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई ४९, सांताक्रुझ ४५, अलिबाग ५८, पणजी २९, डहाणु १६, महाबळेश्वर ३५, पुणे १०,लोहगाव ९, कोल्हापूर ३, नाशिक ५, सातारा ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान