शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात गारपीटीचा इशारा; मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 20:05 IST

राज्यात शुक्रवारी दिवसभरात अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देराज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३९.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ

पुणे : विदर्भात बहुतांश ठिकाणी गुरुवारी पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना,विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वार्‍यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागने दिला आहे.  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३९.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. पावसामुळे विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचवेळी गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे.राज्यात शुक्रवारी दिवसभरात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर, मालेगाव, सातारा, पुणे, लोहगाव येथे किरकोळ पाऊस झाला. 

इशारा: २८ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे.२९ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणीगारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे.३० मार्च रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे..........पुण्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे शहरात पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ शुक्रवारी दुपारी अचानक शहराच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी आल्या. लोहगाव येथे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३ मिमी तर, शिवाजीनगर येथे ०.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहरात होत असलेल्या पावसाने व ढगाळ हवामानाने दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली असली तरी रात्र मात्र गरम होत चालली आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील किमान तापमान २१.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ४.१ अंश सेल्सिअसने अधिक होते.पुढील चार दिवस रात्रीचे तापमान १९ व २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानTemperatureतापमानFarmerशेतकरी