वाल्मिक कराडचा फोन बंद होण्याआधीचं लोकेशन समजलं; 'तो' फोटो पाहून भुवया उंचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:21 IST2024-12-30T13:14:30+5:302024-12-30T13:21:29+5:30
Walmik Karad News : वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी सीआयडीने प्रयत्न सुरू केले आहेत. कराड याच्या लोकेशन बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

वाल्मिक कराडचा फोन बंद होण्याआधीचं लोकेशन समजलं; 'तो' फोटो पाहून भुवया उंचावल्या
Walmik Karad News ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोर या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने मोठी कारवाई केली आहे. सीआयडीने सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. यामुळे आता तपास यंत्रणेने वाल्मिक कराड याचा शोध सुरू केला आहे. पण, कराड याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. वाल्मिक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते, यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे समोर आले आहे.
Maharashtra Politics : 'धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यास, रस्त्यावर उतरू'; बबनराव तायवाडे यांचा इशारा
वाल्मिक कराड याचा १३ डिसेंबर पर्यंत फोन सुरुच होता. पण यानंतर कराड याचा फोन बंद झाला. ११ डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशमधील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत पोलिस अंगरक्षकही दिसत आहेत.
बीड जिल्ह्यातील मस्साजोर येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. कराड याच्या सांगण्यावरुन हत्या केल्याचा आरोप होत आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येला २१ दिवस उलटून गेले पण अजूनही काही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही. दरम्यान, आता या आरोपींना पकडण्यासाठी सर्व पक्षांकडून दबाव वाढला आहे. काही दिवसापूर्वी बीडमध्ये आक्रोश मोर्चा निघाला. या मोर्चात सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.
सीआयडीने आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीयांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी वाल्मिक कराड याची चारही बाजूंनी कोंडी केली आहे. यामुळे आता कराड पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याचे बोलले जात आहे.