शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी उत्तीर्ण होऊनही नोकरीची प्रतीक्षा

By admin | Updated: October 15, 2016 03:19 IST

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही ६५ विद्यार्थी अद्याप नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही ६५ विद्यार्थी अद्याप नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. एमपीएससीकडून अधिव्याख्याता इंग्रजी व शासकिय तंत्रनिकेतन शिक्षक या पदांवर सरळ सेवेत घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी आझाद मैदानात सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.यामधील शिल्पा सोनवणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिव्याख्याता इंग्रजी, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट(अ) या पदांसाठी २०१४ साली परीक्षा झाली. त्यासाठी हजारो उमेदवार प्रविष्ठ झाले होते. मात्र केवळ ८७ उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले. त्यानंतर या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यांपैकी २२ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. तर ६५ उमेदवार अद्यापही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालात कंत्राटी अधिव्याख्यातांना कायम सेवेत घेतल्याने हा घोळ झाल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.सरकारने नियुक्ती द्यावी, म्हणून उमेदवारांनी वर्षभर वाट पाहिली. मात्र त्यानंतरही सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने, उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) धाव घेतली. तिथे लवकर न्याय मिळत नसल्याने उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले. मात्र त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून उमेदवारांनी आझाद मैदानात साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. (प्रतिनिधी)