शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नती नाकारल्यास तीन वर्षे वाट पाहा

By admin | Updated: September 13, 2016 06:09 IST

पदोन्नती नाकारण्याच्या शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांमधील वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठीचे नवे धोरण आज राज्य सरकारने जाहीर केले.

यदु जोशी, मुंबई पदोन्नती नाकारण्याच्या शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांमधील वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठीचे नवे धोरण आज राज्य सरकारने जाहीर केले. त्यानुसार, पदोन्नती नाकारणाऱ्यांना पदोन्नतीसाठी वाट पाहावी लागणार आहे. पदोन्नतीचे पद स्वीकारण्यास नकार देणाऱ्याचे नाव पदोन्नतीसाठी पात्र अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या निवड यादीतून काढण्यात येईल. तसेच, पुढील दोन वर्षे निवडसूचीमध्ये त्यांच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षीच्या निवडसूचीत त्यांची पदोन्नतीसाठीची पात्रता तपासण्यात येणार आहे. त्या वेळच्या गुणवत्तेप्रमाणे संबंधित अधिकारी/कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरल्यास त्यांचा नियमित निवडसूचीत समावेश करण्यात येणार आहे. उदा. २०१५ च्या निवडसूचीसाठी (१.९.२०१४ ते ३१.८.२०१५) १५.१.२०१५ रोजी झालेल्या निवडसूचीत एखाद्या अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला असेल व त्यांनी पदोन्नतीस नकार दिल्यास त्यांचे नाव २०१५ च्या निवडसूचीतून वगळून त्यांचा २०१६ व २०१७ च्या निवडसूचीकरता देखील विचार न करता २०१८ च्या निवडसूचीसाठी विचार करण्यात येणार आहे.

पदोन्नती नाकारल्याच्या तीन वर्षांनंतर दुसऱ्या वेळच्या निवडसूचीकरता विचार करण्यात येईल. त्यानंतर पदोन्नतीस पात्र ठरल्यास मात्र, संबंधिताने पुन्हा पदोन्नतीस नकार दिला तर त्याचा पुढील दोन वर्षे निवडसूचीत विचार करण्यात येणार नाही. पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर पदोन्नतीचे पद स्वीकारण्यास नकार दिलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची वरच्या पदावरील सेवाज्येष्ठता ही ज्यावेळी संबंधित अधिकारी/कर्मचारी पुढील निवडसूचीत (तीन वर्षांनंतरच्या) पदोन्नतीस पात्र ठरेल व प्रत्यक्ष पदोन्नतीच्या पदावर रुजू होईल त्या दिनांकापासून विचारात घेतली जाईल.

पदोन्नती नाकारलेल्यांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ दिले असल्यास ते काढून घेण्यासंदर्भात वित्त विभागाच्या आदेशांनुसार कार्यवाही करण्यात येईल. पदोन्नती नाकारलेल्यांमुळे रिक्त झालेल्या किंवा रिक्त होणाऱ्या पदावर संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याच्या प्रवर्गानुसार व ज्येष्ठतेनुसार पात्र कनिष्ठ अधिकारी/कर्मचाऱ्याचा समावेश निवडसूचीत करण्यात येणार आहे. ज्या अधिकारी/कर्मचाऱ्याने कायमस्वरुपी पदोन्नती नाकारली आहे त्याचा पुढील कोणत्याही काळासाठी निवडसूचीकरता विचार करण्यात येणार नाही.

पदोन्नती नाकारण्यासंदर्भातील अर्ज हा विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकापूर्वी प्राप्त झाल्यास किंवा पदोन्नतीचे आदेश निर्गमित केल्यानंतर देखील प्राप्त झाल्यास ते विचारात घेऊन संबंधितांचे नाव निवडसूचीतून वगळण्यात येईल.पदोन्नती नाकारण्यामागे विभागीय संवर्गपदोन्नतीच्या यादीत क्रमानुसार नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक अशीच पसंती असते. विदर्भ, मराठवाड्यातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने ही अट टाकली. त्यामुळे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा पदोन्नती नाकारण्याकडे अधिक कल असतो. तसेच, विदर्भातील अधिकाऱ्यांना अन्य विभागात जावे लागते. विभागीय संवर्गाची अट रद्द करावी व त्याची सुरुवात महिला अधिकाऱ्यांपासून करावी, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी केली.