हवामान नोंदीच्या नव्या डॉप्लरसाठी १८ महिने प्रतीक्षा

By Admin | Updated: September 2, 2016 01:21 IST2016-09-02T01:21:51+5:302016-09-02T01:21:51+5:30

मुंबई उपनगरातील हवामानाची नोंद अचूक मिळवण्यासाठी नवा डॉप्लर बसवण्यासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती हवामान खात्याने उच्च न्यायालयाने दिली.

Wait for 18 months for a new entry for the Weather Doppler | हवामान नोंदीच्या नव्या डॉप्लरसाठी १८ महिने प्रतीक्षा

हवामान नोंदीच्या नव्या डॉप्लरसाठी १८ महिने प्रतीक्षा

मुंबई : मुंबई उपनगरातील हवामानाची नोंद अचूक मिळवण्यासाठी नवा डॉप्लर बसवण्यासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती हवामान खात्याने उच्च न्यायालयाने दिली. मात्र, उच्च न्यायालयाने नवा डॉप्लर बसवण्यासाठी हवामान खात्याला १८ महिन्यांची मुदत दिली आहे.
मुंबई व उपनगरात किती पाऊस पडणार आहे, याचा अचूक अंदाज मुंबई हवामान खात्याकडून मिळत नसल्याने, मुंबईत २६ जुलैसारखी स्थिती निर्माण होते. त्यामुळे मुंबई हवामान खात्याला मुंबई व उपनगराच्या हवामानचे अचूक नोंद देण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचिका व्यवसायाने वकील असलेले अटल दुबेल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. महापालिकेकडे जोगेश्वरी येथील जागा हवामान खात्याच्या नावे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी या प्रस्तावावर निर्णय घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येईल. त्यावर महापालिकेच्या वकिलांनी जागा हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्यासाठी काही काळ जाईल, अशी माहिती खंडपीठाला दिली. मात्र, खंडपीठाने महापालिकेला संपूर्ण प्रक्रिया दहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महापालिकेने जागा हस्तांतरित केल्यानंतर हवामान खात्याला डॉप्लर बसवण्यासाठी किती कालावधी लागले, अशी विचारणा खंडपीठाने करताच अ‍ॅड. सिंग यांनी जागतिक निविदा काढून कंत्राट देईपर्यंत आणि प्रत्यक्षात डॉप्लर बसवेपर्यंत दोन वर्षे लागतील, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली. मात्र, उच्च न्यायालयाने हवामान खात्याला १८ महिन्यांची मुदत दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Wait for 18 months for a new entry for the Weather Doppler