शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

हात पसरणाऱ्यांची अगतिकता कायम

By admin | Updated: June 30, 2014 00:42 IST

कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने सक्तीचे शिक्षण कायदा अंमलात आणला; एवढेच नव्हे तर परिस्थितीपुढे हात टेकून भिक्षा मागण्याची किंवा कोणापुढे हात पसरण्याची वेळ

कायदा हतबल : बालकल्याण समित्या केवळ कागदावरमनोज ताजने - गोंदियाकोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने सक्तीचे शिक्षण कायदा अंमलात आणला; एवढेच नव्हे तर परिस्थितीपुढे हात टेकून भिक्षा मागण्याची किंवा कोणापुढे हात पसरण्याची वेळ बालकांवर येऊ नये म्हणून शासनाने या बालकांसाठी सुधारगृहासोबतच विविध सोयी उपलब्ध करून दिल्या, पण रेल्वेमध्ये साफसफाई करून कोणापुढे हात पसरणारी किंवा विविध कसरती दाखवून मनोरंजन करीत पैसे मागणारी बालके सर्रास दिसत आहेत. राजरोसपणे हा प्रकार सुरू असताना त्याला आळा घालण्यात संबंधित यंत्रणेला मात्र अपयश येत आहे.गोंदियासारख्या राज्याच्या टोकावरील जिल्ह्यापासून तर राजधानी मुंबईपर्यंत शेकडो चालत्या रेल्वेगाड्यांमध्ये ४ ते १४ वर्षांची मुले कधी भिक्षा मागताना तर कधी साफसफाई करताना दिसतात. प्रवासी खूश होऊन एक-दोन रुपयांचे नाणे त्यांच्या हातावर टेकवतात. सोबतच विविध कसरती दाखवून प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारी चार-पाच वर्षांची मुले रेल्वेत हमखास पाहायला मिळतात. प्रवाशांनी टाकून दिलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या जमा करून त्या विकून चार पैसे मिळवण्यासाठी या बालकांची धडपड सुरू असते. मात्र, हा प्रकार थांबविण्यात रेल्वे पोलीस, बालकल्याण समितीला अपयश येत असल्याचे दिसून येते़ राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाने फेब्रुवारीमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार गोंदिया जिल्ह्यात २७६ बालमजूर आढळले. बालमजुरांसाठी सहायक कामगार कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सात संक्रमण शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र हा प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. याशिवाय सहायक आयुक्त कामगार कार्यालयाच्या माहितीप्रमाणे २८ जून २०१३ पर्यंत जिल्ह्यात १ हजार ४७७ बालमजूर होते. या बालमजुरांसाठी ‘इंडस’च्या माध्यमातून ४० विशेष प्रशिक्षण देणाऱ्या शाळा होत्या. त्या सर्व शाळा बंद करून त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या नावावर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात आले. परंतु बालमजुरीचे प्रमाण अजूनही कमी झाल्याचे दिसून येत नाही. जिल्हा बालकल्याण समिती अशा बालकांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करते. मात्र पालक भूलथापा देत आपल्या पाल्याला संक्रमण शाळांमध्ये घालण्याऐवजी आम्हीच त्याला शिकवतो, असे लिहून देऊन मोकळे होतात. पुढे तोच बालक पुन्हा कामाचे स्वरूप बदलवून लोकांपुढे हात पसरताना नजरेस पडतो. अशा पालकांवर कायद्याचा कोणताही बडगा नसल्याचे दिसून येते.