Voters accept roadster instead of film star: Gopal Shetty | फिल्म स्टार नाही तर, मतदारांनी रोडस्टारला स्वीकारले : गोपाळ शेट्टीं

फिल्म स्टार नाही तर, मतदारांनी रोडस्टारला स्वीकारले : गोपाळ शेट्टीं

मुंबई - उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना रिंगणात उतरवले होते. त्यांच्या विरोधात भाजपने पुन्हा गोपाळ शेट्टींना उमेदवारी दिली होती. मातोंडकर यांनी आपली पूर्ण ताकद लावली होती. चित्रपटात दिसणाऱ्या उर्मिला गल्लीबोळात प्रचार करताना दिसत होत्या. मात्र आत्ताची आकडेवारी पाहता उर्मिला मातोंडकर यांचा पराभव होण्याचे चिन्ह आहे. मतदारांना फिल्म स्टार नाही तर, रोडस्टार हवे आहेत असा टोला शेट्टींनी लगावला आहे.

मुंबई मधील संपूर्ण ६ जागा युतीला मिळणार आहे. तर देशात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे. लोकांना टीव्ही मध्ये दिसणाऱ्या अभिनेत्यांनपेक्षा रस्तावर काम करणारे नेते हवे आहे. म्हणूनच मतदारांनी मला संधी दिली असल्याचे सुद्धा गोपाळ शेट्टी म्हणाले. आधीपेक्षा आता पुन्हा जास्त विकास कामे होणार आहे. असा दावा यावेळी शेट्टी म्हणाले.

सुरुवातीला चुरसीची वाटणारी ही निवडणूक आज प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुन्हा कौल देताना दिसून येत आहे.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला नाकारून भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना पुन्हा एकदा जनता संधी देत असल्याचे दिसत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच गोपाळ शेट्टींनी आघाडी घेतली आहे. या संदर्भात भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Voters accept roadster instead of film star: Gopal Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.