Vitthal temple decorated with tricolor ... | Republic Day; पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सजले तिरंग्या फुलात

Republic Day; पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सजले तिरंग्या फुलात

ठळक मुद्देराष्ट्रीय ध्वजाच्या रंगाप्रमाणे फुलांची सुंदर सजावटविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा उपक्रम

पंढरपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. विठ्ठल मंदिरात भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाप्रमाणे फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे.

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे अनेक भाविक विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मागत असतात. त्याच प्रमाणे धायरी ( पुणे) गाव येथील व मोरया ग्रुपचे सचिन आण्णा चव्हाण,  संदिप विठ्ठल पोकळे, गणेश रमेश दमिष्टे, प्रविण प्रल्हाद पोकळे, दर्शन रामचंद्र मोकाटे, पृथ्वीराज अरुण लायगुडे या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात  फुलांची सजावट करण्यासाठी संधी मागितली होती. यामुळे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी त्यांना संधी दिली. 
२५ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास मंदिरातील विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाप्रमाणे फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे.

Web Title: Vitthal temple decorated with tricolor ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.