शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

विरारच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

By admin | Updated: March 11, 2015 02:18 IST

सोमवार, ९ मार्च रोजी अलिबागच्या ५६वर्षीय महिलेचा मुंबईत मृत्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी विरारच्या एका गर्भवती महिलेचा स्वाइन

मुंबई : सोमवार, ९ मार्च रोजी अलिबागच्या ५६वर्षीय महिलेचा मुंबईत मृत्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी विरारच्या एका गर्भवती महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. मुंबईबाहेरून उपचारासाठी आलेल्या दोन महिला रुग्णांचा दोन दिवसांत मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १५ इतकी झाली आहे. मंगळवार, १० मार्च रोजी स्वाइनचे नवे ६९ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये २४ मुलांचा समावेश आहे. विरार येथे राहणाऱ्या ७ महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेला २६ फेब्रुवारी रोजी परेलच्या वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांनी या महिलेची प्रकृती खालावल्यानंतर सोमवार, २ मार्च रोजी तिला उपचारासाठी केईएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. या महिलेचा रविवार, ८ मार्च रोजी मृत्यू झाला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात स्वाइनच्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात रोडावली होती. पहिल्या काही दिवसांत २० ते ४० रुग्ण आढळत होते. गेल्या तीन दिवसांत रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढून ४७ ते ५२ वर पोहोचली होती. पण, मंगळवारी सोमवारच्या तुलनेत २२ रुग्ण जास्त आढळून आले आहेत. मुंबईत आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ३४ पुरुष तर ३५ महिलांचा समावेश आहे. उपचारासाठी २४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ४५ रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत आहेत. (प्रतिनिधी)