व्हायरल: पवारांच्या कामाबद्दल अमित शहांचे प्रश्न अन् मोदींचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:50 IST2019-09-03T12:35:18+5:302019-09-03T12:50:23+5:30

पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केले असा प्रश्न उपस्थितीत करत, याचा खुलासा पवारांनी पत्रकार परिषद घेऊन करावा असे आवाहन शहा यांनी केले होते.

Viral Video Narendra Modi answer to Amit Shah question | व्हायरल: पवारांच्या कामाबद्दल अमित शहांचे प्रश्न अन् मोदींचे प्रत्युत्तर

व्हायरल: पवारांच्या कामाबद्दल अमित शहांचे प्रश्न अन् मोदींचे प्रत्युत्तर

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या दीड महिन्यांचा काळ शिल्लक राहिला असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाली आहेत. नुकतेच सोलापूरमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करताना काही प्रश्न उपस्थितीत केले होते. मात्र शहांच्या याच प्रश्नांची चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर देत असतानाचा एक व्हिडिओ  व्हायरल झाला आहे.

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सत्तेत असलेले आणि विरोधात बसलेले नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करण्याची कोणतेही संधी सोडत नाहीत. सोलापूरला झालेल्या महाजनादेश यात्रेच्या सभेत अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधाला होता. महाराष्ट्राच्या जनतेने पवार यांना कित्येक वर्षे सत्ता दिली.मात्र पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केले असा प्रश्न उपस्थितीत करत, याचा खुलासा पवारांनी पत्रकार परिषद घेऊन करावा असे आवाहन शहा यांनी केले होते.

अमित शहांच्या प्रश्नाचे उत्तर देणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात शहांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नाच उत्तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असल्याचे दिसत आहे. ज्यात मोदी हे पवार यांची स्तुती करत असल्याचे सुद्धा दिसत आहे. 

अमित शहा यांच्या प्रश्नाचे उत्तर देतांना मोदी हे व्हिडिओत दिसत आहे. मात्र मोदींचा हा व्हिडिओ नवी दिल्लीत पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या प्रकाशनावेळीचा आहे. या कार्यक्रमात मोदींनी पवारांवर स्तुतिसुमने उधळली होती. पवारांनी केलेल्या कामांचा उल्लेख सुद्धा यावेळी मोदींनी आपल्या भाषणात केला होता. मात्र  तोच व्हिडिओ आता भाजपची डोकेदुखी  बनली  असल्याची चर्चा आहे. 

 

 

Web Title: Viral Video Narendra Modi answer to Amit Shah question