शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

विजय वडेट्टीवार जातीयवादी, मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी; विनायक मेटेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 3:58 PM

Vinayak Mete slams vijay vadettiwar: 'मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे.'

मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा राजकारण एकदा राजकारण तापत आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. तसेच, काँग्रेस नेते व राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, मागासवर्गीय आयोग जातीयवादी आयोग असून, तो बंद करावा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षाकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधता म्हटलं की, 'आज आम्ही धरणे आंदोलन करुन सरकारला फक्त इशारा देत आहोत. पण, मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत, तर 23 तारखेपासून अहमदनगरमधून आंदोलनाला सुरुवात करणार, असा इशारा त्यांनी दिला.

'सरकारमध्ये बसलेले काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?'

छत्रपतींच्या स्मारकासाठी वेळ दिला नाहीमेटे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. पण, स्मारकाचं काम अद्यापही सुरु झालेलं नाही. महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना स्मारकाचा विसर पडलाय. छत्रपतींच्या स्मारकाबाबत सरकारने आम्हाला गेल्या 2 वर्षात 2 मिनिटंही वेळ दिला नाही, असं ते म्हणाले. तसेच, शिवस्मारकाचा विषय निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारVinayak Meteविनायक मेटेMaratha Reservationमराठा आरक्षण