शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पोटनिवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून मिळवला विजय, आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 12:28 IST

मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप येथील प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप येथील प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. "भांडुपमधील पोटनिवडणुकीत मोठ मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाने विजय मिळवला," असे ट्विट करत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. काढला आहे. 

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपावर शिवसेना नेतृत्वाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्यानंतर शिवसेनेवर पलटवार करण्याची संधी भाजपाच्या मुंबईतील नेतृत्वाने सोडली नाही. " या पोटनिवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्या विरोधकांचे पोट फाडून भाजपाने विजय मिळवला आहे. या विजयामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. हा विजय विकासाचाच आहे. आता सांगा कोण वेडे ठरले?, असा चिमटा शेलार यांनी ट्विटरवरून काढला." 

 आज राज्यातील विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मुंबईत भांडुपमधल्या प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते. इथून भाजपाच्या उमेदवार जागृती पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे.  त्यांनी 5 हजार मतांनी विजय मिळवला. भाजपा उमेदवार जागृती पाटील यांना एकूण 11229 मते मिळाली तर, शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना 6337 मते मिळाली.  

काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.  भाजपाने ही जागा मिळविण्यासाठी प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेची मदार विद्यमान आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांच्यावर होती. त्यामुळे दोन पाटलांमध्येच या प्रभागात रस्सीखेच सुरू झाली. विशेष म्हणजे, ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी उभय पक्षांचे बडे नेतेच प्रभागात तळ ठोकून होते.  यासाठी महापालिकेतील सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत शिवसेना व भाजपामध्येच दिसून आली. आपल्या जास्तीतजास्त मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू होती, परंतु मतदारांमध्ये महिला मतदार आघाडीवर होत्या. संध्याकाळी साडेपाचपर्यंत ५०.६४ टक्के मतदान झाले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईElectionनिवडणूक