पुणे पोटनिवडणूक - भाजपा-आरपीआयच्या हिमाली कांबळे विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय गायकवाड यांचा केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 10:52 AM2017-10-12T10:52:43+5:302017-10-12T11:01:59+5:30

पुणे महानगरपालिकेच्या कोरेगाव पार्कमधील प्रभाक क्रमांक 21 अ च्या पोटनिवडणुकीत भाजपा-आरपीआयच्या उमेदवार हिमाली कांबळे यांनी बाजी मारली आहे

Pune bypoll - BJP-RPI's Himali Kamble won, defeated NCP's Dhananjay Gaikwad | पुणे पोटनिवडणूक - भाजपा-आरपीआयच्या हिमाली कांबळे विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय गायकवाड यांचा केला पराभव

पुणे पोटनिवडणूक - भाजपा-आरपीआयच्या हिमाली कांबळे विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय गायकवाड यांचा केला पराभव

googlenewsNext
ठळक मुद्देआरपीआयने इथून नवनाथ कांबळे यांची मुलगी हिमानी कांबळेला तिकिट दिले होते. मुख्य लढत हिमानी कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय गायकवाड यांच्यामध्ये होती.

पुणे - पुणे महानगरपालिकेच्या कोरेगाव पार्कमधील प्रभाक क्रमांक 21 अ च्या पोटनिवडणुकीत भाजपा-आरपीआयच्या उमेदवार हिमाली कांबळे यांनी बाजी मारली आहे. त्या 4483 मतानी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय गायकवाड यांचा पराभव केला. धनंजय गायकवाड यांना 3416 मते मिळाली. पहिल्या फेरीपासून हिमाली यांनी आघाडी घेतली होती.  

पहिल्या फेरीच्या मतमोजणीत हिमाली कांबळे यांना 859 तर धनंजय गायकवाड यांना 521 मते मिळाली. दुस-या फेरीत हिमाली तीन हजार मतांनी आघाडीवर होत्या. पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अकाली निधनामुळे कोरेगाव पार्कची ही जागा रिक्त झाली होती. आरपीआयने इथून नवनाथ कांबळे यांची मुलगी हिमाली कांबळेला तिकिट दिले होते. कोरेगाव पार्क 21 अ मधून एकूण सात उमेदवार रिंगणात होते. 

मुख्य लढत हिमानी कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय गायकवाड यांच्यामध्ये होती. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रशांत महस्के यांनी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे ही तिहेरी लढत होती. बुधवारी या पोटनिवडणुकीसाठी  20. 78 टक्के मतदान झाले होते. काल दिवसभर पडलेल्या पावसाचा परिणाम मतदानावर झाला.  

मे महिन्यात नवनाथ कांबळे घराजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुबी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला. पुण्यात भाजप बरोबर युती केल्यानंतर रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांना उपमहापौर बनण्याची  संधी मिळाली होती. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असलेले नवनाथ कांबळे रामदास आठवले यांचे निकटचे स्नेही होते. महाविद्यालयीन काळातच त्यांनी सामाजिक कामाला सूरूवात केली याआधी दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विद्यार्थ्यांसाठी बरेच काही करण्याचा त्यांचा मानस होता मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. 

Web Title: Pune bypoll - BJP-RPI's Himali Kamble won, defeated NCP's Dhananjay Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे