LIVE UPDATES: अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी, गाठला बहुमताचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 09:32 AM2017-10-12T09:32:38+5:302017-10-12T15:28:52+5:30

सध्या राज्यात काँग्रेसला विजयासाठी संघर्ष करावा लागतोय. मात्र नांदेडमध्ये याउलट चित्र आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेस दमदार कामगिरी करत असल्याचे चित्र आहे.

LIVE UPDATES: Nanded municipal corporation power? Ashok Chavan's reputation is a great achievement | LIVE UPDATES: अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी, गाठला बहुमताचा आकडा

LIVE UPDATES: अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी, गाठला बहुमताचा आकडा

Next

नांदेड - सध्या राज्यात काँग्रेसला विजयासाठी संघर्ष करावा लागतोय. मात्र नांदेडमध्ये याउलट चित्र आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेस दमदार कामगिरी करत असल्याचे चित्र आहे. 

लातूरप्रमाणे नांदेडमध्ये भाजपा चमत्कार करुन दाखवेल असे  राजकीय विश्लेषकांना वाटत होते. पण आपला गड टिकवण्यात काँग्रेसला यश मिळाले आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. अशोक चव्हाण आपला बालेकिल्ला राखण्यात यशस्वी ठरतील असे चित्र दिसतेय. मागच्या निवडणुकीत नांदेडमध्ये ब-यापैकी यश मिळवणा-या एमआयएम फॅक्टर निष्प्रभ ठरला आहे. 

LIVE UPDATES

-  काँग्रेसचा पन्नास जागांवर विजय. तर 16 ठिकाणी आघाडी.

- भाजपाची एक जागा वाढली. एकुण तीन उमेदवार विजयी.  काँग्रेसचा 44 जागांवर विजय. 

काँग्रेसचा 43 जागांवर विजय तर 13 जागांवर आघाडी.

- काँग्रेसने गाठला बहुमताचा आकडा. 41 जागांवर उमेदवारी विजयी. अजूनही 12 उमेदवार आघाडीवर.

- काँग्रेसला बहुमतासाठी फक्त चार जागांची गरज.

- काँग्रेसचा 37 जागांवर विजय तर 16 जागांवर आघाडी. भाजपाकडे दोन जागा. शिवसेनेचा एका जागेवर विजय.

- भाजपच्या वैशाली देशमुख गणेश नगर प्रभागातून विजयी, वैशाली देशमुख याना 4537 मतं, काँग्रेसच्या कल्पना देशमुख यांना 3959 मतं.

- काँग्रेसचा 30 जागांवर विजय तर 18 ठिकाणी आघाडी. भाजपाकडे अजूनही एकच जागा तर एका जागेवर आघाडी. शिवसेना एका जागेवर आघाडीवर.

- काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल, टिळक भवन दादर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष.

- शिवसेनेने खातं उघडलं. शिवसेनेचे तरोडा खु. मधील बालाजी कल्याणकर विजयी.

- काँग्रेसचा 26 जागांवर विजय तर 20 जागांवर आघाडी. भाजपाकडे एक जागा तर एका जागेवर आघाडी. शिवसेनेकडेही एका जागेवर आघाडी.

- MIM चे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांची आई जकीया बेगम यांचा होळी प्रभाग 14 मध्ये पराभव, काँग्रेसच्या शबाना बेगम 250 मतांनी विजय.

- काँग्रेसचा 23 जागांवर विजय तर 16 जागांची आघाडी. भाजपाकडे अजूनही एकच जागा.

- अशोक चव्हाणांनी गड राखला. नांदेडमध्ये काँग्रेसचा 22 जागांवर विजय. 

- काँग्रेसचा एकवीस जागांवर विजय तर पंधरा जागांवर आघाडी.

- काँग्रेसचा अठरा जागांवर विजय तर सतरा जागांवर आघाडी.

- काँग्रेसचा 17 जागांवर विजय तर वीस जागांची आघाडी. तर भाजपाकडे अजूनही एकच जागा.
 

- शिवाजी नगर प्रभाग ब

काँग्रेसच्या मोहिनी येवनकर  7165 मतं (विजयी)
अपक्ष निलोफेर बेगम याना 3570 मतं. (पराभूत)

- शिवाजीनगर प्रभाग ड

काँग्रेसचे नागनाथ गद्दम 7009 मतं (विजयी)
भाजपच्या संतोष मानधने याना 2348 मतं  (पराभूत)

- शिवाजी नगर प्रभाग क 
काँग्रेसच्या खान सलीमा बेगम 7120 मतं (विजयी)
राष्ट्रवादी शेख बीबी 2354 (पराभूत)

-  काँग्रेस 14 जागांवर विजयी.

-  काँग्रेसचा 12 जागांवर विजय. 

-भाजपाने खातं उघडलं. भाजपाच्या शांता गोरे यांचा 5057 मतांनी कौठा प्रभागातून विजयी.  काँग्रेसच्या अंबिका काकडे यांचा केला पराभव. अंबिका काकडे यांना मिळाली 4987 मतं.

- काँग्रेसचा  9 जागांवर विजय. तर 20 जागांवर आघाडी.

नांदेड निकाल
- दुसरा निकाल

भाग्यनगर : फारुख अली खान (काँग्रेस) 4881 विजयी
आनंद जवाद्वार भाजपा 3007 मतं

- भाग्यनगर अ- महेंद्र पिंपळे काँग्रेस 5537
साहेबराव गायकवाड 3238

- भाग्यनगर ब
जयश्री पावडे काँग्रेस 6177 विजयी
स्नेहा पांढरे 3263

 - भाग्यनगर क
अपर्णा नेरलकर (काँग्रेस) 4959  विजयी
अरुथती पुरंदरे भाजपा 3210 मतं

-------------------------------------------

- काँग्रेसचा 8 जागांवर विजय. भाजपा, शिवसेनेला अद्याप खातं उघडलं नाही. हैदरबाग आणि भाग्यनगर दोन्ही प्रभागातील 8 जागा काँग्रेसच्या ताब्यात. 

--------------------------------

पहिला निकाल हैदरबाग: शेरअली (काँग्रेस) 5537 विजयी
अ. बासिद एमआयएम 2418

 हैदरबाग11-क
 रजिया बेगम बाबू(काँग्रेस) 5537 विजयी
खैसर बेगम एमआयएम 2418

हैदरबाग11-ड
मसूद खान, काँग्रेस 6500 विजयी
खाजा मसीओद्दीन Mim 3051

हैदरबाग 11-ब
आसिया बेगम हबीब काँग्रेस 6024
सय्यद अजिमाबी एमआयएम 3468

-पहिल्या एक तासात काँग्रेसकडे 17 जागांची आघाडी. भाजपा चार जागांवर आघाडीवर तर एमआयएम एका जागेवर आघाडीवर. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं खातं उघडणं बाकी. 

- मतमोजणीच्या पहिल्या फेरीत काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर, भाजपाकडे 2 जागांची आघाडी तर एमआयएम 1 जागेवर पुढे.

- भाजपाची आठ जागांवर आघाडी तर काँग्रेस 16 जागांवर आघाडीवर. राष्ट्रवादीने खातं उघडलं नाही. 

- वीस जागांचे कल हाती.  शिवसेना 2 तर एमआयएम 2 जागांवर आघाडीवर.

- पहिल्या आर्ध्या तासात 18 जागांचे कल हाती. काँग्रेसला 10 जागांवर आघाडी तर भाजपाला 8 जागांवर आघाडी.

- पोस्टल मतांची मोजणी सुरू. पोस्टल बॅलेटनंतर मुख्य  मतमोजणी होणार. 20 प्रभागातील 81 जागांसाठी मतमोजणी.

- नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी शासकीय तंत्रनिकेतनात मतमोजणीला सुरूवात.

नांदेड - वाघाळा महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी बुधवारी सरासरी ६० टक्के मतदान झालं आहे. शहरातील काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरूच होते. काँग्रेस आणि भाजपामध्ये येथे मुख्य लढत आहे. गुरुवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी निकाल अपेक्षित आहेत.

सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १६ टक्के तर साडेतीन वाजेपर्यंत केवळ ४५ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५च्या सुमारास बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये होणाऱ्या मतमोजणीत दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी सांगितले.

१७पैकी १२ मशीन सुरू
राज्यात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या प्रयोगात ३७पैकी तब्बल १७ ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडली. दीड-दोन तासांनंतर त्यातील १२ मशीन सुरू झाली. चार ठिकाणी व्हीव्हीपॅट काढून ईव्हीएम मशीनवरच मतदान घेण्यात आले. व्हीव्हीपॅट मशिनवरील मतदानाची टक्केवारी मोजण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव शेखर चन्ने हे नांदेडमध्ये दाखल होणार आहेत.

Web Title: LIVE UPDATES: Nanded municipal corporation power? Ashok Chavan's reputation is a great achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.