शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election: 'ती' २ मते बाद?; भाजपा-राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 20:43 IST

विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान झाले. एकूण २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केले

मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले. यात २८५ आमदारांनी मतदान केले. छाननीत ही सर्व मते वैध ठरवण्यात आली. परंतु त्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या मतपत्रिकेवर हा आक्षेप आहे. तिसऱ्या क्रमांकाचं मत देताना ओव्हर रायटिंग करण्यात आल्याने हा आक्षेप घेतला आहे. 

भाजपाच्या या आक्षेपावरून भाजपा-मविआ यांच्यात वाद झाला. २८५ मतांची छाननी पूर्ण झाली त्याचवेळी शेलारांनी एका मतपत्रिकेवर तिसऱ्या पसंतीचे मत देताना ओव्हर रायटिंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. जेणेकरून हे मत कुणी दिले हे कळून येईल असं भाजपा नेते शेलारांचा आक्षेप आहे. परंतु शेलारांच्या आक्षेपाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे मतमोजणीला पुन्हा विलंब झाला. भाजपाच्या आक्षेपानंतर रामराजे कोट्यातलं ते मत बाजूला काढलं आहे. त्यानंतर मविआनेही भाजपा उमेदवार उमा खापरे यांच्या एका मतावर आक्षेप घेतला. त्यानंतर ही दोन्ही मते बाद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसचा आक्षेप, मतमोजणीला विलंबविधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान झाले. एकूण २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांनी मतदान केले. तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांना हायकोर्टाने मतदानाची परवानगी नाकारली तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसनं भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. जगताप, मुक्ता टिळक यांनी मदतनीसाच्या माध्यमातून हे मत दिले असा आक्षेप काँग्रेसनं घेतला. त्यासाठी काँग्रेसनं राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे विधान परिषदेच्या मतमोजणीला विलंब झाला. 

निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळलाभाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील याची खात्री आहे असा दावा भाजपा नेते करत होते. काँग्रेसचे आक्षेप राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवत मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश दिले. सुकृतदर्शनी आक्षेप योग्य नसल्याने मतमोजणीला सुरुवात करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असेल असं भाजपाचे आमदार राहूल नार्वेकर यांनी सांगितलं.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा