शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

लातूर-बीड-उस्मानाबादेतही 'लक्ष्मीदर्शन' चमत्कार...शंभराने मागे असलेली भाजपा 76 मतांनी विजयी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 13:29 IST

भाजपाने मिळवला अशक्यप्राय विजय; धनंजय मुंडेंना मोठा झटका

उस्मानाबाद:  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील द्वंद्वामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत मंगळवारी भाजपाने बाजी मारली. भाजपाचे सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव केला. या विजयामुळे धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे या विजयामुळे पंकजा यांची भाजपातील पत आणखी वाढली आहे. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते 'लक्ष्मीदर्शना'च्या जोरावरच भाजपाला हा चमत्कार साध्य झाला.या निवडणुकीत १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे जवळपास 100 मते कमी होती. मात्र, तरीही मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली. त्यांना एकूण 526 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना 451 मते मिळाली. याशिवाय, 25 मते तांत्रिक कारणामुळे बाद ठरवण्यात आली. याशिवाय, एकाने मतदाराने नोटासाठी मतदान केले. हा निकाल पाहता यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची बरीच मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या भावा-बहिणीतील राजकीय द्वंद्वामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक असणारे रमेश कराड यांना राष्ट्रवादीच्या गोटात दाखल करून धनंजय मुंडे यांनी भाजपावर कुरघोडी केली होती. मात्र, ऐनवेळी रमेश कराड यांना निवडणुकीचा अर्ज मागे घ्यायला लावून पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने धनंजय मुंडे यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत रंगली होती. अखेर या लढतीत पंकजा यांनी बाजी मारून धनंजय यांना चांगलाच झटका दिला. 

ठळक घडामोडी:10.38 या निवडणुकीत १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता . यापैकी 526 मते सुरेश धस यांना तर जगदाळेंना 452 मते मिळाली. तर 25 मते बाद ठरवण्यात आली. याशिवाय, एका मतदाराने नोटासाठी मतदान केले.10.29  अशोक जगदाळे यांच्याकडून फेरमोजणीची मागणी10.16 भाजपाचे सुरेश धस विजयी, राष्ट्रवादीला मोठा धक्का10.14  थोड्याचवेळात बाजूला ठेवण्यात आलेल्या संशयास्पद मतांची मोजणी करणार10.13  सर्व टेबलांवरील मतमोजणी संपली; भाजपाचे सुरेश धस आघाडीवर10.01 प्राथमिक कल : 5 टेबलवरुन मतमोजणी; 3 टेबलवर आघाडी पुरस्कृत अशोक जगदाळे तर 2 टेबलवर भाजपचे सुरेश धस पुढे, मात्र मते एकत्र केल्यास अटीतटीचा सामना8.55 10 ते 10.30 पर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता8.50 पाच टेबलवरून एकाच फेरीत होणार मतमोजणी, 10 वादग्रस्त मते अन्य मतपत्रिकांत मिसळण्यात आली.8.40 मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात, मतपेट्यांचे सील काढून सर्व मतपत्रिका एकत्र करण्याचे काम सुरू8.00. तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूकDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे